मुंबई : काही दिवसांपूर्वी वरुण धवनच्या जवळच्या मित्राचा मृत्यू झाला होता. आपल्या जवळच्या मित्राच्या निधनामुळे वरुण धवनला खूप दुःख झालं आहे. हा जवळचा व्यक्ती दुसरा कोणी नसून वरुण धवनचा ड्रायव्हर आहे. ड्राईव्हरच्या मृत्यूनंतर वरुण धवनला मोठा धक्का बसला आहे. याचा पुरावा एक फोटो आहे जो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

वाळूमध्ये लिहीलं मिस यू भाई
ड्रायव्हर मनोज हा वरुण धवनच्या अगदी जवळचा होता. ज्यांच्या आकस्मिक निधनानंतर वरुण धवनला खूप त्रास होत आहे. त्याने वाळूवर लिहून आपल्या मनाची अवस्था सांगितली आहे. वरुण धवनने वाळूवर लिहिलं, 'मनोज भाई तुझी खूप आठवण येतेय.'


इंस्टाग्रामवर लिहील्या मनातल्या भावना
वरुण धवनने त्याच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवर त्याच्या जवळची व्यक्ती ड्रायव्हर मनोजसाठी एक पोस्ट शेअर केली आहे. वरुण धवनने पोस्टमध्ये लिहिलं, 'मनोज गेल्या 26 वर्षांपासून माझ्या आयुष्यात होता. तो माझं सर्वस्व होता. मी किती दुःखी आहे याचं वर्णन करण्यासाठी माझ्याकडे शब्दांची कमतरता आहे. त्याच्या अप्रतिम विनोदबुद्धीसाठी लोकांनी त्याला नेहमी लक्षात ठेवावं अशी माझी इच्छा आहे. मी स्वत:ला श्रीमंत समजतो की तू माझ्या आयुष्याचा एक भाग होतास.


मेहबूब स्टूडिओत घडला होता किस्सा 
वांद्रे येथील मेहबूब स्टुडिओमध्ये असताना वरुण धवनच्या ड्रायव्हरची तब्येत खालावली. अचानक मनोजच्या छातीत दुखू लागलं, त्यानंतर वरुणसह इतरांनी त्याला तात्काळ लीलावती रुग्णालयात दाखल केलं. जिथे मनोजला मृत घोषित करण्यात आलं.



धवन फॅमिली मनोजच्या परिवाराची घेणार काळजी
सूत्रांनुसार, डेव्हिड धवन यांनी वरुण धवनला मनोजच्या कुटुंबाची काळजी घेतली जाईल असं वचन दिलं आहे.