नवी दिल्ली : गेल्या काही दिवसांपासून अभिनेता वरूण धवन, अभिनेत्री जॅकलिन फर्नांडीस आणि इलियाना डिक्रूज त्यांच्या ‘जुडवा २’ या सिनेमामुळे चांगलेच चर्चेत आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या सिनेमातील ‘टन टनाटन’ आणि ‘उंची हैं बिल्डींग’ गाण्यांनीही धमाका केला आहे. इतकेच काय तर या गाण्यांवर टीम इंडियाचा माजी कर्णधार सौरव गांगुली यानेही ठेका धरलाय. 


‘जुडवा २’ चे कलाकार नुकतेच सिनेमाच्या प्रमोशनसाठी कोलकातामध्ये गेले होते. त्यावेळी सिनेमाच्या कलाकारांनी सौरव गांगुलीसोबत एका शोमध्ये धमाल डान्स केला. वरूण धवनने याचा व्हिडिओ त्याच्या इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. या गाण्यावर डान्स करताना दादाची दादागिरी दिसली आहे. 



‘जुडवा २’ चे हे दोन्ही गाणे सध्या चार्ट बस्टरमध्ये टॉपवर आहेत. येत्या २९ सप्टेंबरला हा सिनेमा रिलीज होणार आहे. ‘जुडवा २’ हा सिनेमा १९९७ मध्ये आलेल्या सलमान खान, करिश्मा कपूर आणि रंभाच्या ‘जुडवा’ सिनेमाचा सिक्वल आहे. दोन्ही सिनेमांचं दिग्दर्शन डेव्हिड धवन यांनीच केलं आहे.