मुंबई : स्टारकिड्स म्हटल तर चर्चा होणारचं.... भट्ट, कपूर आणि खान कुटुंबातील मुलींनंतर धवन कुटुंबाची लेक देखील बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार असल्याच्या चर्चांनी जोर धरला आहे. अभिनेता वरुण धवनची भाची अंजिनी धवन लवकरच बॉलिवूडमध्ये डेब्यू करणार असल्याचं समोर येत आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


सध्या अंजिनी धवन  झगमगत्या विश्वापासून कोसो दूर आहे. पण अंजिनी अभिनेत्री नसली तिच्या चाहत्यांची संख्या फार मोठी आहे. अंजिनीचा एक लूक पाहण्यासाठी चाहते उत्सुक असतात. 



अंजिनी सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. अंजिनी अनेकदा स्वतःचे बोल्ड फोटो आणि व्हिडीओ चाहत्यांसोबत शेअर करत असते. अंजिनी धवन (Anjini Dhawan) सोशल मीडियावर खूपच सक्रिय आहे. सध्या ती तिच्या डान्स स्कीलवर ही फोकस करत आहे.



अंजिनी धवन ही सिद्धार्थ धवन आणि राखी टंडन यांची मुलगी आहे. सिद्धार्थ हा वरुण धवनचा चुलत भाऊ आहे. सिद्धार्थ धवन हा अनिल धवनचा मुलगा आहे. अंजिनी धवन (Anjini Dhawan)  आलिया भट्ट आणि वरुण धवण प्रमाणेच करण जोहरच्या सिनेमातून डेब्यू करु शकते.