Varun Dhawan : बॉलिवूड अभिनेता वरुण धवन हा चित्रपट दिग्दर्शक डेव्हिड धवन यांचा मुलगा आहे. तरी सुद्धा त्यानं करण जोहरच्या 'स्टुडंट ऑफ द इयर' या चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं आहे. हा चित्रपट सुपरडूपर हिट ठरला आणि या चित्रपटात काम करणाऱ्या तिन्ही कलाकारांचं नशिब पालटलं. आता त्याच्या वडिलांनी त्याला लॉन्च का केलं नाही याविषयी वरुन धवननं खुलासा केला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

वरुन धवननं त्याची भाची अंजिनी 'बिन्नी अ‍ॅन्ड फॅमिली' च्या ट्रेलर लॉन्चवर बोलताना सांगितलं की त्याच्या कुटुंबात एकमेकांना मदत करण्याची पद्धत नाही. याविषयी सविस्तर सांगत वरुण म्हणाला, 'ती माझी भाची आहे. पण मी इथे मोठ्या भावाप्रमाणे आलो आहे. हा एक चांगला चित्रपट आहे. त्यामुळे मी इथे आहे. जसं माझ्या वडिलांनी मला कधी लॉन्च केलं नाही, कारण माझ्या कुटुंबात अशी परंपरा नाही, त्यांचा या सगळ्यावर विश्वास नाही. अंजिनीनं जे काही केलं, त्यात आमची काही मदत नव्हती आणि तिनं केलेल्या कोणत्याही कामाचं श्रेय येणं माझ्यासाठी चुकीचं असेल.'



पुढे वरुण म्हणाला, अंजिनीनं तिच्या स्वत:च्या बळावर स्वत: चं स्थान निर्माण केलं आहे आणि तिला तिच्या प्रवासावर गर्व आहे. संजय त्रिपाठीनं दिग्दर्शित केलेल्या 'बिन्नी अ‍ॅन्ड फॅमिली' च्या तीन पिढ्यांमध्ये असलेली गोष्ट दाखवतोय की त्यांच्यात कसं नातं आहे आणि कोणत्या समस्येचा ते सामना करत आहेत. अंजिनी धवन या चित्रपटात बिन्नीची भूमिका साकारत आहे. महावीर जैन फिल्म्स आणि वेव बॅन्ड प्रोडक्शन्स निर्मिती हा चित्रपट 20 सप्टेंबर रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. 


हेही वाचा : धवन कुटुंबातील आणखी एका सदस्याची बॉलिवूडमध्ये एन्ट्री! चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित


वरुणनं त्यांचा पहिल्या चित्रपटाच्या प्रमोशन दरम्यान, असचं काही केलं होतं. न्यूज एजंसी PTI ला सांगितलं होतं की 'वडील डेव्हिड धवन यांनी त्याच्या चित्रपटसृष्टीतील करिअरसाठी त्याची साथ दिली नाही आणि नाही त्यांनी त्याला सांगितलं की तू अभिनेता होऊ नको. त्यांनी मला सांगितलं की मला जे हवं आहे किंवा मला ज्या क्षेत्रात करिअर करायचं आहे ते कर. वडील म्हणून त्यांनी प्रत्येक क्षणी मला साथ दिली आणि मला त्या सगळ्या गोष्टी दिल्या ज्याची मला गरज होती.'