धवन कुटुंबातील आणखी एका सदस्याची बॉलिवूडमध्ये एन्ट्री! चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित
Dhawan`s Family Member Debut : आता धवन कुटुंबातील या सदस्यानं केलं बॉलिवूडमध्ये पदार्पण...
Varun Dhawan's Niece : लोकप्रिय दिग्दर्शिका एकता कपूर आणि अभिनेता वरुण धवननं त्याची पुतणी अंजिनी धवनची प्रेक्षकांशी ओळख करून दिली आहे. त्याचं कारण काय असेल असा प्रश्न तुम्हालाही पडला असेल तर अंजिनीचा हा पहिला चित्रपट आहे. तिच्या चित्रपटाचा ट्रेलरनं सगळ्यांचे लक्ष वेधले आहे. खरंतर अंजिनीच्या या चित्रपटातून 'हर जनरेशन कुछ कहते है' असा खास संदेश दिला आहे.
या चित्रपटाचे दिग्दर्शन संजय त्रिपाठी यांनी केले आहे तर चित्रपटाची निर्मिती ही महावीर जैन फिल्म्सनं केली आहे. त्यांच्यासोबत शिखा के आल्हुवालिया आणि वेव्हबँड प्रॉडक्शनचे ए झुनझुनवाला हे सहनिर्माते आहेत. चित्रपटाचे निर्माते महावीर जैन म्हणाले "आपल्या सर्वांसाठी हा चित्रपट एक वेगळा अनुभव असेल आणि प्रेक्षकांना या हृदयस्पर्शी कथेशी जोडलेले पाहून मला खूप आनंद झाला आहे. मला विश्वास आहे 'बिनी आणि फॅमिली' केवळ मनोरंजनच करणार नाही तर कौटुंबिक बंधनांच्या सौंदर्याला महत्त्व देणाऱ्या प्रत्येकाला प्रेरणा देईल "
अंजिनी धवनचा हा पहिला चित्रपट असून या बद्दल बोलताना ती म्हणते 'बिन्नी अँड फॅमिली' माझ्यासाठी नेहमीच खास असेल या भूमिकेनं मला कौटुंबिक नातेसंबंधांच्या हृदयात डोकावण्याची गोष्ट दिली आणि हा अनुभव चित्रित करण्याची संधी दिली आहे. अशा अर्थपूर्ण प्रकल्पाचा भाग झाल्याबद्दल मी नेहमीच थॅंक्फूल असेन.'
चित्रपटाबद्दल निर्मात्यांनी या पूर्वी सांगितलं की ‘बिन्नी आणि फॅमिली’ हा नव्या पिढीचा चित्रपट आहे. जो आजच्या पिढीतील अंतर शोधतो. चित्रपटाच्या माध्यमातून प्रत्येक पिढीला एकमेकांच्या जवळ आणण्याचे त्यांचे ध्येय असल्याचे निर्मात्यांनी सांगितले. ट्रेलरसह एक नवीन पोस्टर देखील अनावरण करण्यात आल आहे. या चित्रपटात ‘हर जनरेशन कुछ कहता है’ हा प्रभावशाली संदेश देण्यात आला असून जो कुटुंबातील प्रत्येक सदस्याच्या दृष्टिकोनावर प्रकाश टाकणार आहे असं निर्माते वचन देतात.
हेही वाचा : लग्नाच्या 4 महिन्यातच गोविंदाच्या भाचीचा घटस्फोट? संतप्त अभिनेत्री फोटो शेअर करत म्हणाली...
चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जसजशी जवळ येत आहे तस या चित्रपटाच्या कथेत काय आहे हे पाहण्यासाठी सगळेच उत्सुक आहेत. संजय त्रिपाठी लिखित आणि दिग्दर्शित महावीर जैन फिल्म्स आणि वेव्हबँड प्रॉडक्शनचा झुनझुनवाला निर्मित 'बिन्नी अँड फॅमिली’ 20 सप्टेंबर 2024 रोजी थिएटरमध्ये रिलीज होणार आहे.