मुंबई : सुपरस्टार सलमान खानच्या 'जुडवा' या सिनेमाचं रिमेक केल्यानंतर अभिनेता वरूण धवन यांच सलमान खानबाबत काय मत आहे हे त्याने स्पष्ट केलं आहे. वरूण धवन म्हणतोय की, सलमान खान हा सर्वश्रेष्ठ असून मदतीसाठी तत्पर असणारी ही व्यक्ती आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

वरूण धवनने म्हटलं की, सलमान खान ही खूप वेगळी व्यक्ती आहे. डेविड धवन यांच्यासोबत सलमान खानचे अनेक गाजलेले सिनेमे आहेत. वरूण धवनने सलमान खानच्या जुडवा या सिनेमाचा रिमेक केला. जो डेविड धवन यांनीच दिग्दर्शित केला आहे. 


वरूण धवन आता दिग्दर्शक शूजित सरकार यांच्या 'ऑक्टोबर' सिनेमाची वाट पाहत आहे. वरूण धवनने याबाबत ट्विट केलं होतं की, मी काही वेगळं केलेलं नाही. शूजि सरकारचा दृष्टिकोन यासाठी जास्त महत्वाचा आहे. आपण तेव्हाच पुढे जाऊ शकतो जेव्हा आपण आपल्यापेक्षा प्रतिभावान लोकांसोबत काम करू.


तसेच वरुण धवन 'सुई धागा' टेलरच्या भूमिकेत आहे.  'मौजी' या नावाची व्यक्तीरेखा आहे. तरअनुष्का कपड्यांवर नक्षीकाम (एम्ब्रॉयडरी) करणाऱ्या ममताच्या भूमिकेत दिसणार आहे.'मेड इन इंडिया' अशी टॅगलाइन असलेल्या या सिनेमाची कथा मध्य प्रदेशातील आहे.  'सुई धागा' सिनेमात वरुण-अनुष्का सायकलवर फिरताना सिनेमात दिसतील. शरत कटारिया 'सुई धागा' या सिनेमाचं दिग्दर्शन करत आहेत. तर मनीष शर्मा सिनेमाचे निर्माते आहेत.यशराज बॅनरचा हा सिनेमा गांधी जयंतीच्या पार्श्वभूमीवर २८ सप्टेंबरला रसिकांच्या भेटीला येतोय.