मुंबई : 'जुडवा' या चित्रपटाचा सिक्वेल लवकरच रसिकांच्या भेटीला येणार आहे. तापसी पन्नु, वरुण धवन आणि जॅकलिन फर्नांडिस या तीन कलाकारांची धमालमस्ती जुडवा २  या चित्रपाटामध्ये पहायला मिळणार आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुंबईत कोसळणार्‍या पावसामुळे जुडवा २ चित्रपटाच्या प्रमोशन इव्हेंट्सचे तीन तेरा वाजले. कमी वेळात अधिक लोकांपर्यंत पोहचण्यासाठी कलाकार आजाकाल सोशल मीडियाचा वापर करत आहेत. 
 हैदराबादला जुडवा २ च्या प्रमोशनसाठी नुकतीच टीम पोहचली होती. या प्रमोशनमध्ये वरुणने त्याला भविष्यात तेलगू सिनेमात काम करण्याची इच्छाही व्यक्त केली. एवढचं बोलून वरूण थांबला नाही तर चक्क त्याने तेलगू बोलण्याचा प्रयत्नही केला.  



 


  ‘मला तेलगू सिनेमात काम करायचे आहे’हे वाक्य वरूण पहिल्याच फटक्यात अचूक बोलला. वरूणच्या या प्रयत्नाचे कौतुकही झाले. 


'टन टना टन' आणि 'उची है बिल्डिंग' या चित्रपटातील नव्या स्वरूपातील गाण्यांना चाहत्यांचा उत्तम प्रतिसाद मिळाला आहे. त्यामुळे येत्या २९ सप्टेंबरला बॉक्सऑफिवर किती कमाल करतो हे पाहणं औत्सुक्याचे ठरणार आहे.