मुंबई : १९९७ मध्ये आलेल्या ‘जुडवा’ या सिनेमाने प्रेक्षकांचं इतकं मन जिंकलं की, आता या सिनेमाचा सिक्वल ‘जुडवा २’ येत आहे. आधीच्या सिनेमातील सुपरहिट गाणी याही सिनेमात बघायला-ऎकायला मिळणार आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

त्यातील सलमान खानचं त्यावेळी गाजलेलं ऊंची है बिल्डिंग' हे गाणं ‘जुडवा २’मध्येही आहे. हे नवं गाणं नुकतंच रिलीज करण्यात आलंय.


या धमाकेदार गाण्यात वरूण धवन, जॅकलिन आणि तापसी पन्नू यांच्या धमाल डान्समूव्ह बघायला मिळत आहेत. त्यासोबतच जॅकलिन आणि तापसीने या गाण्याचे ग्लॅमरचा जबरदस्त तडकाही लावला आहे. त्यामुळे गाणं आणखीनच धमाकेदार झालंय. 



'ऊंची है बिल्डिंग 2.0' या गाण्याला संदीप शिरोडकर याने संगीत दिलंय. या गाण्याचे ओरिजनल कंपोजर अनु मलिक आहेत. हे गाणं अनु मलिक यांनी नेहा कक्कर सोबत गायलं आहे. येत्या २९ सप्टेंबरला हा सिनेमा रिलीज होतोय.