250 कोटी रुपयांचं कर्ज फेडण्यासाठी वाशु भगनानीनं विकलं 7 मजली ऑफिस, 80% कर्मचाऱ्यांना काढलं
Vashu Bhagnani Sold Office To Pay 250 Crores Debt : वाशु भगनानी यांनी 250 कोटींचं कर्ज फेडण्यासाठी विकलं ऑफिस...
Vashu Bhagnani Sold Office To Pay 250 Crores Debt : जवळपास चार दशकांनंतर आता वाशु भगनानी यांच्या पूजा एन्टरटेंमेंट एक मोठी फाऊंडेशन आहे. 'कुली नंबर 1', 'बीवी नंबर 1', 'हीरो नंबर 1', 'मिशन रानीगंज', 'जवानी जानेमन' आणि 'बेल बॉटम' अशा गाजलेल्या चित्रपटांचं प्रोडक्शन करण्यासाठी ओळखल्या जाणाऱ्या या बॉक्स ऑफिसमध्ये थोडे मागे होते. लेटेस्ट रिपोर्टनुसार, वाशु भगनानी यांचं पूजा एंटरटेमेंटच्या सात मजली ऑफिसला एका बिल्डरला विकलं. जमीन विकल्यानंतर त्यांना किती मानधन मिळालं याविषयी कोणतीही माहिती समोर आलेली नाही. दरम्यान, त्या ठिकाणी आता रेसिडेन्शियल प्रोजेक्ट बनवण्यात येणार आहे.
बॉलिवूड हंगामाच्या रिपोर्टनुसार, या बिल्डिंगला तोडून त्या जागी एक लग्झरीय रेसिडेन्शियल टॉवर बनवणार आहेत. रिपोर्ट्सनुसार, वाशु यांनी जवळपास 80% कर्मचाऱ्यांना काढून टाकलं आणि संपूर्ण ऑफिस हे जुहूच्या दोन बेडरुम असलेल्या फ्लॅटमध्ये ट्रान्सफर केलं. रिपोर्ट्समध्ये असं सांगितलं आहे की लेऑफ हे जानेवारी 2024 पासून सुरु झालं, जेव्हा टायगर श्रॉफचा 'जगन शक्ति' हा चित्रपट फ्लॉप ठरला. त्याचं कारण म्हणजे या चित्रपटासाठी त्यांनी जवळपास दोन वर्ष खूप मेहनत केली होती. त्यानंतर जेव्हा 'बडे मिया छोटे मिया' हा चित्रपट आला त्यानंतर आणखी लोकांची संख्या कमी करण्यात आली. हे सगळं वाशु भगनानी यांनी त्यांच्यावर असलेलं 250 कोटींचं कर्ज फेडण्यासाठी केलं आहे. चित्रपटांना सतत मिळणाऱ्या अपयशानंतर त्यांच्यावर या सगळ्याचा आर्थिक परिणाम झाला आणि त्यामुळे त्यांनी अखेर हा निर्णय घेतला आहे.
हेही वाचा : 'मला मारू नका...', अमिताभ बच्चन यांनी प्रभासच्या चाहत्यांकडे हात जोडून का मागितली माफी?
या विषयी सविस्तर बोलायचं झालं तर 'बडे मिया छोटे मिया' हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप झाला. 350 कोटी रुपयांचं बजेटमध्ये बनलेल्या या चित्रपटानं 59.17 कोटींची कमाई केली आहे. त्यामुळे या प्रोडक्शन हाऊसला 125-150 कोटींचं नुकसान झालं. वाशु भगनानी आणि जॅकी भगनानी आता पूजा एन्टरटेंनमेंटला पुन्हा एकदा त्याच प्रकारे उभं करण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यासाठी पुढे काय करता येईल यावर काम सुरु आहे. रिपोर्ट्सनुसार, ऑफिस विकल्यानंतर शाहिद कपूर स्टारर 'अश्वत्थामा' या चित्रपटावर काम सुरु करत आहेत. याच चित्रपटाची काही महिन्यांपूर्वी त्यांनी घोषणा केली होती.