'मला मारू नका...', अमिताभ बच्चन यांनी प्रभासच्या चाहत्यांकडे हात जोडून का मागितली माफी?

Amitabh Bachchan Apologized to Prabhas Fan : अमिताभ बच्चन प्रभासच्या चाहत्यांना घाबरले... 'मला मारू नका' असं का म्हणाले बिग बी...

दिक्षा पाटील | Updated: Jun 24, 2024, 03:09 PM IST
'मला मारू नका...', अमिताभ बच्चन यांनी प्रभासच्या चाहत्यांकडे हात जोडून का मागितली माफी?
(Photo Credit : Social Media)

Amitabh Bachchan Apologized to Prabhas Fan : 'कल्कि 2898 एडी' ची प्रेक्षक गेल्या अनेक दिवसांपासून प्रतीक्षा करत आहेत. नाग अश्विन दिग्दर्शित हा चित्रपट 27 जून रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. त्या आधीच प्रभास आणि अमिताभ बच्चन यांच्यात भांडण होणार आहे. पण खऱ्या आयुष्यात त्या दोघांमध्ये खूप चांगलं नातं आहे. ते हसताना-खेळताना दिसतात. असचं काहीसं सध्या पाहायला मिळालं आहे. त्यावेळी अमिताभ यांनी थेट प्रभासच्या चाहत्यांशी माफी मागितली आहे. चला तर जाणून घेऊया नक्की काय आहे प्रकरण...

वैजयंती नेटवर्कनं युट्यूबवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यात 'कल्कि 2898 एडी' च्या निर्मात्यांनी प्रियंका दत्त आणि स्वप्ना दत्तशिवाय प्रभास, अमिताभ बच्चन, दीपिका पदुकोण आणि कमल हासन दिसत आहेत. त्यांनी पुढे नाग अश्विनच्या या चित्रपटाविषयी मोकळेपणानं सांगितलं आहे. त्यांनी पुढे बिग बींविषयी सांगतना सांगितलं की जेव्हा नाग अश्विन त्यांच्याकडे चित्रपटाची ऑफर घेऊन गेले होते. तेव्हा पुढे काही बोलण्या आधी त्यांनी प्रभासच्या चाहत्यांची माफी मागितली होती. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

अमिताभ बच्चन म्हणाले की 'जेव्हा नागी माझ्याकडे याविषयी बोलायला आहे, तेव्हा ते फक्त एक फोटो घेऊन आले होते. एक सीन ज्यात दाखवण्यात आलं होतं की माझी भूमिका कशी दिसेल आणि प्रभास कसा दिसेल. मी एक खूप मोठा माणूस असल्याचं दाखवण्यात आलं आहे जो 'द' प्रभासला धक्का देतोय. त्यामुळे प्रभासच्या सगळ्या चाहत्यांची मी आधीच माफी मागतो. मी जे करेन, ते पाहिल्यानंतर मला मारू नका.'

एकीकडे अमिताभ बच्च यांनी त्यांना असलेली भीती सांगितली तर दुसरीकडे प्रभासनं त्यांना आश्वासन दिलं की त्याचे चाहते देखील बिग बींवर प्रेम करतात. त्यानं सांगितलं की ते सगळेच त्यांचे फॅन आहेत. या दरम्यान, अमिताभ यांनी नाग अश्विनच्या दुरदृष्टीकोणाची स्तुती केली आहे. ते हैराण होते की कोणी अशा प्रकारचा चित्रपट करण्याचा विचार करत होता. अमिताभ बच्चन या व्हिडीओत प्रभासला चिडवताना देखील दिसत आहेत. ते प्रेक्षकांना सांगताना दिसत आहेत की प्रभास त्याच्या बहिणीला घाबरतो. 

हेही वाचा : 'माणसाचं मन मोठं नाही तर...', क्रितिकाशी केलं गैरवर्तन केल्यानंतर रणवीर शौरीवर संतापला अरमान मलिक

प्रभासच्या बहिणीविषयी बोलायचं झालं तर 'कल्कि 2898 एडी' मध्ये प्रभासच्या बहिणीनं असिस्टंट डायरेक्टर म्हणून काम केलं आहे. जेव्हा प्रभासनं अमिताभ यांची भेट त्यांच्या बहिणीशी करुन दिली तेव्हा तो म्हणाला, 'लहान असताना ही मला आदेश द्यायची.' हे ऐकून बिग बी म्हणाले, 'मला मारू नका.'

By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.

x