लग्नानंतर नयनताराकडून पतीला खास भेट; किंमत ऐकून म्हणाल `बायको हवी तर अशी`
नशीब काढलं लेकानं...
मुंबई : दाक्षिणात्य चित्रपट जगतातील अतिशय गाजलेली अभिनेत्री नयनतारा काही दिवसांपूर्वीच विवाहबंधनात अडकली. दिग्दर्शक विग्नेश शिवन याची आयुष्यभरासाठी साथ देण्यातं वचन देत तिनं त्याचा पती म्हणून स्वीकार केला. तामिळनाडूतील महाबलीपूरमस्थित एका रिसॉर्टवर या लग्नाचा सोहळा पार पडला.
बॉलिवूड किंग, शाहरुख खान याच्यासह बऱ्याच सेलिब्रिटींनी या लग्नाला हजेरी लावली होती. एकिकडे लग्नाची चर्चा असतानाच दुसरीकडे या लग्नसोहळ्यामध्ये भेटवस्तूंचा झालेला वर्षावही थक्क करुन गेला. (Actress Nayantara Gifted worth 20 crores gift to husband vignesh shivan)
पतीला नयनकडून खास भेट...
सूत्रांच्या माहितीनुसार नयनतारानं तिच्या पतीला लग्नात एक अतिशय खास भेट दिली. जवळपास 20 कोटी रुपये इतक्या किमतीचा बंगला तिनं पतीला भेट स्वरुपात दिला. याच घरात येत्या काळात जी नवविवाहित जोडी त्यांचा संसार थाटणार आहे.
फक्त पतीच नव्हे, तर सासरच्या बऱ्याच मंडळींना नयननं खास गिफ्ट दिले. नणदेला सोन्याची भेट देत तिनं तिचंही मन जिंकलं. नातेवाईकांवरही भेटवस्तूंचा वर्षाव करण्यापासून ती मागे नव्हती.
लग्नाचा दिवस कायमस्वरुपी लक्षात रहावा यासाठी विग्नेशनंही आपल्या पत्नीवर भेटवस्तूंचा वर्षाव केला. तिच्यासाठी त्यानं 5 कोटी रुपयांची अंगशी बनवून घेतली होती. तर, लग्नासाठी 3 कोटी रुपयांचे दागिनेही त्यानं तिला दिले होते.
जोडीदाराला खास भेटवस्तू देत या नवख्या सेलिब्रिटी कपलनं सर्वांनाच थक्क केलं. काहींना तर विग्नेशचा हेवाही वाटला.