Prajakt Deshmukh Accident: मराठी चित्रपटसृष्टीत वेड या सिनेमानं सगळ्या प्रेक्षकांना वेड लावलं आहे. डिसेंबर महिन्यात प्रदर्शित झालेल्या या चित्रपटानं सगळ्यांनाच वेड (Ved) लावलं आहे. गेल्या महिन्याभरात या चित्रपटानं चित्रपटगृहांवर अक्षरक्ष: डंका मारला आहे. सहा वर्षांपुर्वी प्रदर्शित झालेल्या सैराट (Sairat) या चित्रपटानंतर वेड या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. या चित्रपटातील कलाकारांच्या अभिनयाचेही खूप कौतुक करण्यात आलं आहे. या चित्रपटाचा संवादलेखक प्राजक्त देशमुख यांचा गाडीला अपघात झाला आहे याबद्दल त्यानं स्वत:हून इन्टाग्रामवरून फोटो शेअर केला आहे आणि झाल्या प्रकाराबद्दल त्यानं संताप व्यक्त केला आहे. हल्ली हायवेवरती अनेक अपघातांच्या मालिका सुरू झाल्या आहेत. सध्या हा प्रकार नाशिक-मुंबई हायवेवरती घडला आहे. (ved marathi movie dialogue writer prajakt deshmukh car breaks at nashik mumbai highway)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

प्राजक्त हा नाशिक - मुंबई हायवेवरती पोहचलो आणि क्षणातच काय झालं हे त्यालाही कळलं नाही. घडल्या प्रकाराचा व्हिडीओ प्राजक्तनं सोशल मीडियावर शेअर केला आहे. प्राजक्तनं ट्विट करत सांगितले आहे की, ''नाशिक मुंबई हायवे वरुन धावणा-या अवजड वाहने बेशिस्तीने चालतात.भिवंडी फाट्या अलिकडे एका ट्रकने सिमेटचा डिवायडर ब्लॅाक उडवला आणि तो माझ्या गाडीवर आदळला. थोडक्यात बचावलो.मी सुखरुप आहे.परंतू या हायवेला कुणी वाली आहे का? की केवळ स्पिडगन लाऊन दंडाच्या पावत्या ठोकणे इतकंच यांचं काम? '' असं त्यानं एका पोस्टमध्ये लिहिलं आहे. 


''ट्रकने ब्लॅाक उडवला म्हणजेच तो उजवीकडून चालत होता.अवजड वाहन हायवेला डावीकडून चालणं अपेक्षित असतांना अत्यंत बेजबाबदारपणे हे घडलं. शिवाय ट्रकवाला न थांबता पळून गेला. नशीब बलवत्तर म्हणून वाचलो. नाशिक मुंबई हायवेवर जीव मुठीत धरुन गाड्या चालवा. जपा.'' असं त्यानं एका कमेंटमध्ये म्हटलं आहे. 


सध्या त्याची पोस्ट सगळीकडेच व्हायरल होते आहे. त्यामुळे सगळ्यांनीच त्यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. बेशिस्तपणामुळे अपघात होत असतात. त्यामुळे लोकांनी काळजी घेणं खूप जास्त महत्त्वाचं आहे. त्यामुळे या पोस्टनं पुन्हा एकदा हायवेवरती होणाऱ्या अपघातांबद्दलची चर्चा सुरू झाली आहे. 



प्राजक्त देशमुख हा खूप प्रसिद्ध लेखक आणि दिग्दर्शक आहे. त्याच्या संगीत देवबाभळी या नाटकानं मराठी प्रेक्षकांची मनं जिंकून घेतली होती. ज्येष्ठ अभिनेते श्रीराम लागू, ज्येष्ठ दिग्दर्शिका विजया मेहता यांनी त्याच्या नाटकाला हजेरी लावली होती आणि त्याच्या नाटकाचे कौतुकही केले होते. परंतु सध्या या घटनेनं त्याच्या चाहत्यांना धक्का बसला आहे.