मुंबई : 2018 सालचा बहुप्रतिक्षित सिनेमा म्हणजेच 'वीरे दी वेडींग' 1  जूनला रीलिज झाला आहे. करिना कपूर आई झाल्यानंतर तर सोनम कपूरचं लग्न झाल्यानंतर त्यांचा रिलीज होणारा हा पहिलाच सिनेमा आहे. त्यामुळे त्यांच्या प्रेक्षकांमध्ये या चित्रपटाबाबत कमालीची उत्सुकता होती. 


एकता कपूरचं ट्विट 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

 



सोनम कपूर, स्वरा भास्कर, करिना कपूर आणि शिखा तल्सानिया यांची प्रमुख भूमिका असलेल्या या चित्रपटाची बॉक्सऑफिसवर दमदार एन्ट्री झाली आहे. या चित्रपटाला प्रेक्षकांसोबतच समीक्षकांचीही पसंती मिळाली आहे. बॉक्स ऑफिसवर पहिल्या दिवशी 'वीरे दी वेडिंग' या चित्रपटाने 10.70 कोटींची कमाई केली आहे. पहिल्या दिवसाच्या कमाईनंतर सहनिर्मिती एकता कपूरने याबाबतचं ट्विट केलं आहे. 


 
करिना कपूर प्रमुख भूमिकेत


चित्रपटाची कहाणी करिना कपूर साकारत असलेल्या कलिंदी या भूमिकेविषयी फिरत आहे. कलिंदीचं लग्न ठरलं आहे मात्र ती त्याबाबत खूपच गोंधळलेल्या अवस्थेमध्ये असते. या चित्रपटाचे दिग्दर्शन शशांक घोष यांनी केले असून रिया कपूर आणि एकता कपूर या चित्रपटाच्या निर्मात्या आहेत. 1 जूनला हा चित्रपट सिनेमागृहामध्ये प्रदर्शित झाला.