मुंबई : सोनम कपूरच्या लग्नानंतर दोनच दिवसांत तिच्या आगामी सिनेमा 'वीरे दी वेडिंग'चं दुसरं गाणं प्रदर्शित करण्यात आलंय. या सिनेमातून करिना कपूर एका मोठ्या ब्रेकनंतर मोठ्या पडद्यावर दिसणार आहे. अशावेळी पहिल्याच गाण्यात सिनेमातील चारही अभिनेत्री हॉट लूकमध्ये दिसत होत्या... तिथं या नव्या 'भांगडा दा सजदा'मध्ये करीना, सोनम, स्वरा यांचा देसी पण स्टायलिश अंदाज लोकांना आवडताना दिसतोय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'वीरे दी वेडिंग'च्या गाण्यात भांगडा दिसतोय... आणि त्याचे बीटस तुम्हाला नाचण्यासाठी भाग पाडायला लावतील.


'भांगडा दा सजदा' गाणं नेहा कक्कड, सूर्या रंगनाथन आणि श्वेता सचदेवा यांनी गायलंय. तर हे गाणं लिहिलंय गौरव सोलंकीनं... 


काही दिवसांपूर्वी या सिनेमातलं पहिलं गाणं 'तारीफां' प्रदर्शित करण्यात आलं होतं. या गाण्यालाही प्रेक्षकांचा चांगलाच प्रतिसाद मिळाला.