मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री सोनम कपूर, करिना कपूर, स्वरा भास्कर आणि शिखा तल्सानिया यांचा वीरे दी वेडींग सिनेमा प्रदर्शनाच्या वाटेवर आहे. यादरम्यान सिनेमातील वीरे हे नवे गाणे प्रदर्शित झाले. या गाण्यात या चौघी मैत्रिणींचा मस्तीभरा अंदाज पाहायला मिळत आहे. गाण्याचे संगीत मस्त आहे आणि ते प्रेक्षकांच्या पसंतीस उतरेल, अशी आशा आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हे गाणे विशाल मिश्रा, आदिती सिंग शर्मा, युलिया वंतूर, धवानी भानुशाली, निकीता आहुजा, पायल देव आणि शारवी यादव यांनी गायले आहे. तर गाण्याचे बोल अनविता दत्तने लिहिले आहेत. गाणे अत्यंत सुंदरपणे चित्रित केले आहे. यापूर्वी सिनेमातील तारीफां आणि भागंडा तां सजदा ही दोन गाणी प्रदर्शित झाली आहेत. आता पहा हे नवे गाणे...



या सिनेमात चार मैत्रिणींची मैत्री दाखवण्यात आली आहे. सिनेमाची संपूर्ण कथा या चौघींवर आधारीत आहे. १ जूनला हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येईल. सिनेमाची निर्मिती सोनम कपूरची बहीण रिया कपूर आणि एकता कपूर यांनी एकत्रितपणे केले आहे.