Laxmikant Berde On Marathi Film Industry: भारतीय चित्रपटसृष्टीमध्ये अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे यांचे नावं हे अजरामर आहे. आजही त्यांच्या चित्रपचटांची चर्चा होताना दिसते. 2004 साली त्यांनी या जगाचा निरोप घेतला आज त्यांना जाऊन 19 वर्षे झाली तरीसुद्धा त्यांच्या अभिनयाचे आपण सर्वचजण फॅन्स आहोत. त्यांच्या अभिनयानं मराठी चित्रपटसृष्टीत चार चांद लावले होते. फक्त मराठीच नाहीतर हिंदी चित्रपटांतूनही त्यांनी उत्तमोत्तम भुमिका या केलेल्या आहेत. त्यांचे चित्रपट हे आजही प्रेक्षकांना पाहायला आवडतात. त्यातून त्यांचा अशी ही बनवाबनवी तर अनेकदा पाहिला जातो. आता ओटीटीवरही असल्याने हा चित्रपट प्रेक्षक अनेकदा पाहतात. मराठी चित्रपटसृष्टी ही आता खूप मोठी गेलेली आहे. मराठी चित्रपटांना आता आंतरराष्ट्रीय दर्जा मिळला आहे. त्यामुळे मराठी चित्रपटांचे नावं हे अगत्यानं घेतले आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

लक्ष्मीकांत बेर्डे जर का आज असते तर त्यांनीही मराठी चित्रपटांचे मनापासून कौतुक केले असते. सध्या त्यांचा असाच एक जूना व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतो आहे. यावेळी त्यांनी मराठी चित्रपटसृष्टीवर भाष्य केले आहे. @oldisgold या इन्टाग्राम पेजवरून या व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. ज्यात त्यांनी कॅप्शनमध्ये म्हटलं आहे की, ''लक्ष्या मामांनी 20 वर्ष आधी व्यक्त केलेली खंत आजही कायम आहे, आजही लोक मराठी चित्रपट कमी आणि बॉलीवूड आणि साऊथ चित्रपट जास्त बघतात. मी मराठी'' ही मुलाखत दुरदर्शन सह्याद्रीवरील आहे. यावेळी नक्की त्यांनी या मुलाखतीत काय म्हटलं आहे जाणून घेऊया. 


मराठी चित्रपट आणि पॅन इंडिया 


सध्या मराठी सिनेमांना चित्रपटगृह मिळत नाही सोबतच बॉलिवूड मराठी चित्रपटांना ओव्हरटेक करतोय अशा चर्चा अनेकदा आजही होताना दिसत आहेत. आज मराठी चित्रपटांनी जगात नाव कमावले असले तरीसुद्धा मराठी चित्रपटांनाही कुठेतरी संघर्ष करावा लागतो आहे. दाक्षिणात्त्य सिनेमा हा भारतात रूजला आहे सोबतच या चित्रपटांना जागतिक प्रेक्षकही आहे. याच विषयावर लक्ष्मीकांत बेर्डे बोलताना दिसत आहेत. 


हेही वाचा - ''आजही स्त्रियांना...'' 'बाईपण भारी देवा' चित्रपट पाहिल्यानंतर संजय मोनेंची लेक आणि बायकोसाठी खास पोस्ट


काय म्हणाले लक्ष्मीकांत बेर्डे?


30 वर्षांपुर्वी त्यांनी हे भाकित केलं होतं असं नेटकऱ्यांचे म्हणणे आहे. ते या मुलाखतीत म्हणाले होते की, ''साऊथला जेव्हा मद्रासी, तेलुगू चित्रपट प्रदर्शित होतात तेव्हा तिकडचे लोक त्यांना प्रतिसाद देतात. तेव्हा त्यांचा (चित्रपट निर्मात्यांचा) उत्साह वाढतो. जोपर्यंत तुम्ही आम्हाला उत्साह देत नाहीत, तोपर्यंत मराठी चित्रपट चालणार नाहीत.'' या व्हिडीओ खाली अनेकांनी कमेंट्स केल्या आहेत.


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 


एकानं लिहिलंय की, ''मराठी लोकांचा परक्या बॉलिवूडला असलेल्या अती महत्त्वामुळेचं मराठीत हिरो असून पण यांना नोकराची भूमिका करावी लागली असणार हिंदीत ,आणि हे पाहून कोणत्याही मराठी माणसाला कधी लाज पण वाटली नाही हे दुर्दैव आहे.'' तर अनेकजण लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या या वक्तव्यावर सहमत असून आज सर्वच जणं त्यांना मिस करतायत.