मुंबई : ज्येष्ठ अभिनेते रमेश देव अनंतात विलीन झाले. बुधवारी रात्री ९ वाजता त्यांनी अखेरचा श्वास घेतला. हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचे निधन झाले. वयाच्या ९३ व्या वर्षांनी रमेश देव यांनी पहिल्यांदाच एक गुपित चाहत्यांसोबत शेअर केलं होतं. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तीन दिवसांपूर्वीच म्हणजे ३० जानेवारी रोजी रमेश देव यांचा ९३ वा वाढदिवस झाला. त्यावेळेच्या एका मुलाखतीत त्यांनी आपला विक पॉईंट काय आहे हे शेअर केलं होतं. (Veteran Actor Ramesh Deo shared top secret in their life after 93 years ) 


कायमच चिरतरूण आणि उत्साहाने भरलेले रमेश देव सगळ्यांना आनंद द्यायचे. पण हे फुलं आणि सुंदर मुली हा त्यांचा विक पॉईंट होता. असं स्वतः रमेश देव यांनी म्हटले होते. (रमेश देव यांची 'ही' सून लाखात एक, तितकीच लोकप्रिय आणि देखणी; माहितीये?)


 


रमेश देव यांनी अभिनेता, सहकलाकार अगदी खलनायकाची भूमिका देखील उत्कृष्ठ निभावली. त्यामुळे त्यांच्या अभिनयाचे आणि व्यक्तीमत्वाचे सगळेच चाहते होते. आज या उमद्या कलाकाराला आपण अखेरचा निरोप दिला आहे.  


रमेश देव यांनी 1956 साली प्रदर्शित झालेल्या 'आंधळा मागतो एक डोळा' या चित्रपटात प्रमुख भूमिका साकारली होती. त्यांनी 180 हून अधिक मराठी चित्रपटांतून भूमिका साकारल्या.


रमेश देव यांच जगण्यावर प्रेम होतं. त्यांनी कोणती गोष्ट लपवली नाही. जी गोष्ट त्यांना आवडते. त्याचा त्यांनी मनमुराद आनंद घेतला.


जगण्यावर भरपूर प्रेम केलं. त्यामुळे त्यांच्या जाण्याचं दुःख न मानता, त्यांच्या आयुष्याचा आतापर्यंतचा प्रवास हा सोहळ्याप्रमाणे साजरा करावा, असा निर्णय त्यांचा मुलगा आणि अभिनेते अजिंक्य देव यांनी घेतला.