मुंबई : ज्येष्ठ अभिनेते रमेश देव यांनी वयाच्या 93 व्या वर्षी जगाता निरोप घेतला हिंदी आणि मराठी चित्रपटसृष्टी गाजवणाऱ्या या अभिनेत्याचं चिरतरुण व्यक्तीमत्त्वं कायमच अनेकांना हेवा वाटेल असंच होतं. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुख्य म्हणजे काही माणसं सकारात्मकता आणि उत्साहाचा स्त्रोत असतात, खळखळणारा झरा असातात. देव हे त्यापैकीच एक. 


त्यांच्या आतापर्यंतच्या अनके मुलाखती म्हणजे पाहणाऱ्यांसाठी नुसता आनंद आणि हास्याचा नजराणा. 


शिवाय पत्नी सीमा यांची असणारी साथही तितकीच मन जिंकणारी. रमेश देव यांच्या मुलांनीही कलाजगतात नाव कमवलं. त्यातच भर म्हणून त्यांच्या सुनेनंही तिची वेगळी ओळख तयार केली. 


रुपानं देखणी, कलागुणसंपन्न सून असणं हे त्यांचं भाग्य आणि देवांच्या कुटुंबात येणं हे सुनेचं, असं म्हणणं वावगं ठरणार नाही. 


कदाचित रमेश आणि सीमा देव यांच्या सुनेला तुम्ही अनेकदा पाहिलंही असेल. पण, तुमच्या लक्षात आलं नसावं की त्या यांच्या सून आहेत.



युट्यूब आणि खाद्यपदार्थ, मेजवानी, रेसिपीच्या दुनियेत चर्चेत असणारं हे नाव म्हणजे स्मिता देव. दिग्दर्शक अभिनय देवची पत्नी.


एका मुलाखतीत रमेश देव यांनी आपल्या या सुनेचं तोंड भरुन कौतुक केलं होतं. 'Karwar to Kolhapur via Mumbai' या पुस्तकाचं आपल्या सुनेनं लेखन केल्याचं सांगत ती सर्वोत्तम जेवण बनवते असं म्हणत त्यांनी तिची स्तुती केली होती. 


रमेश देव यांची ही सून म्हणजेच त्यांच्या अभिनय या मुलाची पत्नी. स्मिता देव या एक लोकप्रिय लेखिका आणि युट्यूबर आहेत. 



विविध प्रकारच्या खाद्यसंस्कृतींवर आधारित त्यांच्या अनेक व्हिडीओ, पाककृती आज जवळपास सर्वांच्या स्वयंपाकघरात केल्या जातात. 


सोपी सरळ भाषा, मनमिळाऊ स्वभाव आणि सर्वांना आपलंसं करुन हसतमुखाने गोष्टी समजावून सांगण्याची कला यामुळं स्मिता देवही कुटुंबाचा वारसा एका अर्थी पुढे नेत आहेत असं म्हणायला हरकत नाही.