पुणे : चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले आणि अन्य तीन जणांविरोधात पुण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. स्वत:च्या आर्थिक फायद्यासाठी पुण्यातील मुळशी तालुक्यातील जमिनीची विक्री करून १४ जणांची फसवणूक केल्याचा आरोप विक्रम गोखले यांच्यावर करण्यात आला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अभिनेते विक्रम गोखले, जयंत रामभाऊ म्हाळगी, सुजाता जयंत म्हाळगी यांच्याविरोधात पुण्यातील पौड पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला. त्यांनी ९६ लाख ९९ हजार रूपयांची फसवणूक केल्याची तक्रार जयंत बहिरट यांनी केली होती. 


 


वाचा : Corona मास्क बनवण्यासाठी सरकारची अनोखी शक्कल; कैद्यांना लावलं कामाला


गिरीवन प्रकल्प हा मागील तीस वर्षांपासून अगदी व्यवस्थित सुरु असल्याची माहिती संबंधित प्रकल्पाच्या व्यवस्थापनाकडून देण्यात आली. काही जमीन मालकांनी त्यांच्या जमिनीची मोजणी करून घेतली असता त्यांना त्यांचा सातबाराचा उतारा आणि वहिवाट यात फरक आढळला. जमिनीची मालकी आणि वहिवाट या दिवाणी स्वरूपाच्या विषयांमधील फरकांची विसंगती कशी दूर करता येईल याबाबत संबंधित जमीन मालकांच्या बरोबर चर्ता सुरु आहेत, ही माहितीही त्यांनी दिली. शिवाय कोणाचीही फसवणूक करण्याचा गिरीवनचा हेतू नसल्याचं प्रोजेक्ट मॅनेजमेंटकडूव सांगण्यात आलं.