मुंबई : आजपर्यंत लाखो प्रेक्षकांना ज्यांनी आपल्या विनोदातून हसवलं ते ज्येष्ठ अभिनेते कादर खान यांनी आज जगाचा निरोप घेतला आहे. नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी 1 जानेवारी 2019 रोजी कादर खान यांच निधन झाल्याची बातमी समोर आली आहे


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कादर खान यांनी 31 डिसेंबर 2018 रोजी सायंकाळी 6 वाजता अखेरचा श्वास घेतला. कादर खान हे 81 व्या वर्षाचे होते. 


कॅनडातील हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असताना त्यांनी जगाचा निरोप घेतला आहे. त्यांचा मुलगा सरफराज यांनी स्वतः ही माहिती दिली आहे. 


ग्रेसिव सुप्रान्यूक्लीयर पाल्सी डिसऑर्डरमुळे कादर खान यांच्या मेंदूने काम करणं बंद केले होते. यामुळे त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं होतं. 


कादर खान यांनी जवळपास 43 वर्षे बॉलिवूडमध्ये काम केलं आहे. आपल्या विनोदी अभिनयाच्या जोरावर त्यांनी 300 हून अधिक सिनेमांमध्ये काम केलं आहे. 


एवढंच नव्हे तर त्यांनी सिनेमाचं संवाद लेखन देखील केले असून 250 सिनेमांकरता हे लेखन केलं आहे. 2015 मध्ये 'दिमाग का दही' या सिनेमात त्यांनी शेवटचं काम केलं. 


कादर खान अनेक सिनेमांमध्ये गोविंदासोबत दिसले आहेत. त्यांचे राजा बाबू, छोटे सरकार, आज का दौर, जैसी करनी वैसी भरनी सारखे अनेक सिनेमे लोकप्रिय ठरले. 




गोविंदा-कादर खानच्या जोडीची धमाल 


सिल्वर स्क्रीनवर कादर खान आणि गोविंद या जोडीने खूप धमाल उडवली. दोघांनी अनेक सुपरहिट सिनेमे दिलेत. दरिया दिल, राजा बाबू, कुली नंबर 1, छोटे सरकार, आंखें, तेरी पायल मेरे गीत, आंटी नंबर 1, हीरो नंबर 1, राजाजी, नसीब, दीवाना मैं दीवाना, दूल्हे राजा, अखियों से गोली मारे यासारख्या सिनेमांचा समावेश आहे.