गरोदरपणातच अभिनेत्रीला शूट करावा लागला रेप सीन; अचानक रक्तस्त्राव होऊ लागला आणि...
जी कधीच सर्वांसमोर येत नाही आणि आलीच तर मात्र ऐकणाऱ्या, पाहणाऱ्यांना धक्का बसतो.
मुंबई : कोणत्याही लोकप्रिय कलाकाराकडे आणि त्यांच्या जीवनशैलीकडे पाहताना आपल्याला त्यांचा हेवा वाटतो. राहणीमान असो किंवा नशीबात आलेली श्रीमंती... हे सगळं आपल्यालाही मिळायला हवं अशीच आशा आपणही मनोमनी व्यक्त करत असतो. पण, या झगमगाटाची एक दुसरी बाजूही आहे. (Bollywood Movies )
ही अशी बाजू आहे, जी कधीच सर्वांसमोर येत नाही आणि आलीच तर मात्र ऐकणाऱ्या, पाहणाऱ्यांना धक्का बसतो.
एका ज्येष्ठ आणि तितक्याच लोकप्रिय अभिनेत्रीसोबत घडलेल्या प्रसंगामुळं सध्या हे सर्व बोलावं लागत आहे. कारण, चित्रपटांमध्ये काम करण्यासाठी शब्द दिल्याखातर तिला गरोदरपणातही बलात्काराच्या दृश्याचं चित्रीकरण करावं लागलं होतं.
ही अभिनेत्री म्हणजे मोसमी चॅटर्जी(Moushumi Chatterjee) . 10 वी इयत्तेमध्ये शिकत असतानाच चॅटर्जी यांचं लग्न लावून देण्यात आलं. त्यांचं खरं नाव इंदिरा चॅटर्जी. बंगाली चित्रपट दिग्दर्शक तरुण मजूमदार यांनी त्यांचं नाव बदलून मोसमी असं केलं.
एका मुलाखतीत चॅटर्जी यांनी त्यांच्यासोबत घडलेल्य़ा एका भयंकर प्रसंगाचा उलगडा केला. 1972 मध्ये आलेल्या 'रोटी कपडा और मकान' या चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान आपण गरोदर असल्याचं त्यांनी सांगितलं. (moushumi chatterjee Movies)
त्याचवेळी बलात्काराच्या दृश्याचं चित्रीकरण करणार असल्यामुळं त्या फार घाबरल्या होत्या. सीनदरम्यान त्यांच्यावर खूप सारं पीठ पडलं होतं आणि हे पाहून त्यांचा थरकाप उडाला होता. त्या ढसाढसा रडू लागल्या आणि अचानक कोसळल्या.
तो प्रसंग अतिशय कठीण होता कारण चॅटर्जी यांना रक्तस्त्राव सुरु झाला होता. त्यांना तताडीनं रुग्णालयात दाखल करण्यात आलं. सुदैवानं त्यांच्या बाळाला कोणतीही इजा झाली नव्हती. चॅटर्जी यांनी साकारलेल्या या दृश्याची त्यावेळी बरीच चर्चा झाली.
दृश्याचं चित्रीकरण करणंही त्यांच्यासाठी दिसलं तितकं सोपं नव्हतं. एक अभिनेत्री म्हणून चॅटर्जी यांनी सामना केलल्या त्या प्रसंगाचा त्यांना आजही विसर पडू शकलेला नाही.