मुंबई : ६०च्या दशकात बॉलिवूडवर अधिराज गाजवलेली प्रसिद्ध अभिनेत्री श्यामा यांचे निधन आज सकाळी मुंबई निधन झाले. त्या ८२ वर्षांच्या होत्या.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

श्यामा यांचे मूळ नाव खर्शीद अख्तर असे होते. मात्र दिग्दर्शक विजय भट्ट यांनी त्यांना ‘श्यामा’ ही नवी ओळख दिली. श्यामा यांनी सावन भादो , दिल दिया दर्द लिया यांसह तब्बल १७५ चित्रपटांमध्ये त्यांनी काम केले आहे.


श्यामा यांनी १९६०मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘बरसात की रात’ आणि ‘आर पार’ या दोन चित्रपटांत अभिनय केला होता. तर ‘मिलन’या चित्रपटातील अभिनयासाठी श्यामा यांना प्रतिष्ठेचा फिल्मफेअर पुरस्कार मिळालाय. सहाय्यक भूमिकेसाठी त्यांना पुस्कार मिळाला.


श्यामा यांनी सिनेमॅटोग्राफर फली मिस्‍त्री यांच्यासोबत १९५३ मध्ये विवाह केला. १९७९ मध्ये मिस्‍त्री यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात दोन मुले आणि एक मुलगी असा परिवार आहे.