झीनत अमान यांचे उद्योगपतीवर आरोप, पाठवत होता अश्लील मेसेज
प्रसिद्ध अभिनेत्री झीनत अमान यांनी मुंबईच्या एका बिझनेसमनवर पाठलाग करण्याचा आणि धमकवण्याचा आरोप लावला आहे.
मुंबई : प्रसिद्ध अभिनेत्री झीनत अमान यांनी मुंबईच्या एका बिझनेसमनवर पाठलाग करण्याचा आणि धमकवण्याचा आरोप लावला आहे. झीनत यांनी मुंबईच्या जुहू पोलीस स्टेशनमध्ये या बिझनेसमन विरोधात तक्रार दाखल क्ली आहे. मात्र, आरोपी सध्या फरार आहे.
काय आहे प्रकरण?
पोलिसात दिलेल्या तक्रारीनुसार, मुंबईचा बिझनेसमन सरफराज ऊर्फ अमन खन्ना(३८) हा झीनत अमान यांचा अनेक दिवसांपासून पाठलाग करत आहे. आरोपीने झीनत अमान यांच्या व्हॉट्सअॅपवर अनेक अश्लील मेसेज पाठवले होते. दोन दिवसांआधी त्याने झीनत यांच्या घरात घुसून गैरवर्तन केलं आणि सिक्युरिटी गार्डला मारहाणही केली.
झीनत यांना धमकी
आरोपीने झीनत अमान यांना बघून घेईन अशी धमकीही दिली आहे. पोलिसांनी सरफराज याच्या विरोधात गुन्हा दाखल करून घेतला असून त्याचा शोध घेत आहे.
कोण आहे सरफराज?
मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी सरफराज एकेकाळी फिल्ममेकर होता. काही लोकांनी त्याला रिअल इस्टेट बिझनेसमध्ये असल्याचे सांगोतले. काही लोकांचं हेही म्हणनं आहे की, सरफराज मानसिक आजारी आहे. त्याच्या विरोधात याआधी अनेक गुन्हे दाखल आहेत.