प्रशांत अनासपुरे, झी मीडिया, मुंबई : ज्येष्ठ कलादिग्दर्शक शरद पोळ यांचे निधन झाले आहे. मुंबईत वयाच्या ८५व्या वर्षी यांनी अखेरचा श्वास घेतला. महेश कोठारे, सचिन पिळगावकर यांच्या अनेक चित्रपटांचे कलादिग्दर्शक म्हणून शरद पोळ यांनी काम केले.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मराठीसह हिंदी चित्रपटांसाठीही त्यांनी आपला एक वेगळा ठसा उमटवला. तब्बल १० वेळा राज्य पुरस्कारचा सर्वोकृष्ट कलादिग्दर्शक म्हणून यांचा गौरव झाला आहे. ९० मराठी आणि ६० हिंदी चित्रपटांचे कलादिग्दर्शक त्यांनी केले आहे.


सुधीर फडके निर्मित स्वातंत्र्यवीर सावरकर चित्रपटासह अशीही बनवाबनवी, आत्मविश्वास, नवरी मिळे नवऱ्याला या चित्रपटांसाठी त्यांनी काम केले आहे. हिंदीत ज्वेल थिफ, ईश्वर अशा अनेक चित्रपटात त्यांनी काम केले. अभिनेता मनोज जोशी यांनी हिंदी ईश्वर चित्रपटासाठी त्यांना सहाय्यक कलादिग्दर्शक म्हणून साथ केली होती.