`तुम्हाला कोणी अधिकार दिला की तुम्ही....?` ज्येष्ठ अभिनेते अरुण गोविल कोणावर संतापले
दिग्दर्शक ओम राऊत यांच्या आदिपुरूष या चित्रपटाचा टिझर नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.
Actor Arun Govil on Adipurush: ऐंशीच्या दशकात सुपरहिट ठरलेली रामायण (Ramayana Serial) ही मालिका आजही आपल्या सर्वांचा आवडते आणि त्या मालिकेतून मिळालेल्या संस्कारांची आपल्याला कायमच जाणीव राहते. आदिपुरूष (Adipurush controversy) या चित्रपटामुळे उडालेल्या वादंगामुळे लोकांना पुन्हा एकदा रामायण मालिकेची आठवण होते आहे. त्यामुळे वाईटातून चांगलं होतं ते हे असं... असंच म्हणावं लागेल. (veteren actor arun govil shares his disappointment on film adipurush and makers)
परंतु आदिपुरूष या चित्रपटामुळे आज पुन्हा एकदा त्या दिवसांची आठवण होते आहे जेव्हा दुरदर्शनवर रामायण ही मालिका लागताच रस्ते ओस पडायचे आणि आपल्या घराचे दरवाजे बंद करून प्रेक्षक एक तास रामायण या मालिकेचा आनंद घ्यायचे.
दिग्दर्शक ओम राऊत (Director Om Raut) यांच्या आदिपुरूष या चित्रपटाचा टिझर नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या टीझरवरून सगळीकडेच संतापचं वातावरण पसरलं आहे. प्रभु राम, रावण आणि रामभक्त हनूमान यांचा लुक पुर्णतः चुकीचा दाखवल्यामुळे प्रेक्षकांमध्ये संतप्त प्रतिक्रिया उमटल्या आहेत. या वादंगामुळेच अनेक ठिकाणाहून कलाकारांच्या, प्रेक्षकांच्या, राजकारण्यांच्या आणि समाजिक कार्यकर्त्यांच्या चांगल्या वाईट प्रतिक्रिया उमटयला लागल्या आहेत.
नुकतंच सीता ही व्यक्तिरेखा साकारणाऱ्या दिपिका यांनी आपली तिखट प्रतिक्रिया व्यक्त केली. खुद्द आदिपुरूष चित्रपटाच्या दिग्दर्शकांनी म्हणजेच ओम राऊत यांनी आपल्या चित्रपटाची बाजू सावरत प्रतिक्रिया व्यक्त केली. परंतु खुद्द प्रभु राम यांची भुमिका अजरामर करणारे ज्येष्ठ अभिनेते अरूण गोविल (Actor Arun Govil on Adipurush) यांनी आपली रोखठोक प्रतिक्रिया मांडली आहे जी सध्या सर्वत्र व्हायरल होते आहे.
अरूण गोविल म्हणाले की, ''आदिपुरूष या चित्रपटाच्या एका झलकमुळे सध्या चारही बाजूंनी चर्चा, वाद सुरू झाला आहे. सर्वत्र हंगामा आहे, वाईटसाईट गोष्टी कानावर पडत आहेत. मलाही या चित्रपटाच्या टीझरवर प्रतिक्रिया देण्यासाठी अनेक फोन आले. परंतु मी कोणाशीची यावर बोललो नाही. पण आता मी त्यावर बोलणार आहे.''
''खूप दिवसांपासून माझ्या मनात अनेक गोष्टी चालू होत्या. त्या गोष्टी तुमच्यासोबत शेअर करण्याची वेळ आली आहे असं दिसतंय. 'रामायण' आणि 'महाभारत' सारखे सर्व पौराणिक ग्रंथ आणि धर्मग्रंथ हा आपला सांस्कृतिक आणि धार्मिक वारसा आहे. ते आपल्या मानवी सभ्यतेचा पाया आहेत. त्यांना बदलले जाऊ शकत नाही आणि त्यातून त्यांच्यासोबत कुठलीही छेडछाड करणे योग्य नाही.''
''आपल्या धर्मग्रंथातून आपल्याला संस्कार मिळतात, जगण्याचा आधार मिळतो. आपला हा वारसा आपल्याला जगण्याची कला शिकवतो. आपली संस्कृती ही जगातील सर्वात जुनी संस्कृती आहे. अशा स्थितीत छेडछाड केल्यास धार्मिक भावना दुखावल्या जातात.''
''अडीच वर्षांपूर्वी जेव्हा कोरोना आला तेव्हा आपल्या धार्मिक श्रद्धा दृढ झाल्या आहेत. एवढेच नाही तर कोरोनाच्या काळात पुन्हा एकदा 'रामायण'चे प्रक्षेपण सुरू झाले तेव्हा त्याने विश्वविक्रम केला होता. आपल्या आजच्या तरुण पिढीने 35 वर्षांपूर्वी साकारलेले रामायण पूर्ण श्रद्धा आणि श्रद्धेने पाहिले.''
आदिपुरूषबद्दल बोलताना अरूण गोविल यांनी स्पष्ट केले की, ''कुठल्याही प्रकारे आपल्या या परंपरेत बदल करता कामा नये. मीही यापुढे जे सत्य आहे, शाश्वत आहे तेच दाखवायचा प्रयत्न करेन. आजकाल सतानत धर्माची खिल्ली उडवायचा ट्रेण्ड सुरू झाला आहे. मला कळतं नाही यांना हा अधिकार कोणी दिला की अशाप्रकारे छेडछाड करून आमच्या धार्मिक भावना दुखवायच्या?'', असा रोखठोक सवाल करत त्यांनी कलाकार-दिग्दर्शकांना सिनेमॅटिक लिब्रटीच्या नावाखाली परंपरेची खिल्ली उडवू नये असा इशाराही दिला.