Amitabh Bachchan KBC: वयाच्या ८० व्या वर्षी आजही बॉलीवूडचे दिग्गज कलाकार अमिताभ बच्चन अभिनयक्षेत्रात सर्वात टॉपला आहेत. त्यांच्या अभिनयावर आजही लोकं भरभरून प्रेम करतात. त्यांच्या संवादांची जादू तर आजच्या काळातही तितकीच प्रभावी आहे. 
बीग बी हे सध्या आपल्या केबीसी या शोमुळे भलतेच चर्चेत आहेत. त्याच्या या शोमध्ये हरहून्नरी स्पर्धक सहभागी होत असतात. स्पर्धेसोबत रंगणाऱ्या या कार्यक्रमात स्पर्धकांसमवेत अमिताभजी गप्पागोष्टी आणि रंजक किस्सेही सांगतात. अनेकदा ते स्पर्धकांना प्रश्न विचारतात तर स्पर्धक त्यांना. त्यामुळे चर्चांना भलतेच उधाण येते. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नुकत्याच झालेल्या केबीसी एपिसोडमध्ये बीग बींनी असाच एक रंजक किस्सा सांगितला. अमिताभ बच्चन यांनी त्यांच्या शालेय दिवसातील एक मजेदार किस्सा शेअर केला आहे. 


KBC 14 च्या नुकत्याच एका एपिसोडमध्ये नैनितालचे रहिवासी प्रशांत शर्मा हॉटसीटवर बसले होते. प्रशांत शर्मा हे एका हॉटेल मॅनेजमेंट युनिव्हर्सिटीचे डीन आहेत. यावेळी अमिताभ यांनी प्रशांत यांच्याशी संवाद साधला. 


अमिताभ बच्चन यांनी शोमध्ये खुलासा केला की त्यांचे शालेय शिक्षणही नैनितालमध्ये झाले आहे. प्रशांतने त्याला विचारले की नैनिताल येथील त्यांचे आवडते रेस्टॉरंट कोणते? यावर बिग बी म्हणाले, “त्यावेळी रोटीसोबत पकोडा खूप मिळायचा. जिथे आमची शाळा होती तिथे एक रेस्टोरंट होते जिथे बटाट्याची भाजी रोटीमध्ये गोल रोलप्रमाणे बांधून मिळायची" 


हा किस्सा सांगताना अमिताभ बच्चन यांनी सांगितले की ते त्या रेस्टॉरंटच्या भिंतीवर चढायचे. पण कारण फक्त रेस्टॉरंटचं नव्हतं तर अमिताभजी हे मुलींना पाहण्यासाठी भिंतीवर चढायचे, असा किस्सा त्यांनी बोलता बोलता सांगितला. त्यांनी सांगितले की आमच्यासाठी अशी करामत करणे फार सोप्पे होते कारण आमच्या शाळेच्या शेजारीच मुलींची शाळा होती त्यांना पाहण्यासाठी आम्ही भिंतीवर चढायचो, असा गमतीदार किस्सा त्यांनी यावेळी सांगितला. 


2000 मध्ये अमिताभ बच्चन यांनी 'कौन बनेगा करोडपती' हा शो होस्ट करण्यास सुरुवात केली आणि तेव्हापासून बिग बींनी स्पर्धक आणि प्रेक्षकांसोबत त्यांच्या आयुष्याशी संबंधित अनेक खुलासे केले आहे तसेच या शोदरम्यान स्पर्धकांची संघर्षमय कहाणीही त्यांनी प्रेक्षकांसमोर आणली आहे. या शोनं अनेकांना प्रेऱणा दिली आहे. सध्या ते 'कौन बनेगा करोडपती'चा 14 वा सीझन होस्ट करत आहेत.