Anil Kapoor: अनिल कपूर (Anil Kapoor) यांनी नुकतीच करन जोहरच्या कॉफी विथ करन (Coffee with Karan) या कार्यक्रमामध्ये हजेरी लावली होती. करण जोहरच्या या कॉर्ट्रोव्हर्शल शोमध्ये अनिल कपूर यांनी अनेक धक्कादायक खुलासे केले आहेत. त्यातून या शोमध्ये अनेक कॉर्ट्रोव्हर्शल विषयांची चर्चा होत असल्याने अनिल कपूर यांनी नुकताच एक धक्कादायक खुलासा केला आहे. (vetern actor anil kapoor opens on actor jackie shroff on his success see what he says)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नव्वदच्या दशकात अभिनेते जॅकी श्रॉफ आणि अभिनेते अनिल कपूर यांचे जबरदस्त फॅन फॉलोइंग होते. त्या काळात या दोन्ही हिरोंचे सिनेमे पाहण्यासाठी लोक गर्दी करायचे. आजही या दोन कलाकारांचे सिनेमे पाहण्यासाठी लोकं आतुर असतात. अनिल कपूरने करण जोहरच्या प्रसिद्ध चॅट शो 'कॉफी विथ करण 7'मध्ये जॅकी श्रॉफबद्दल काही गोष्टी सांगितल्या आहेत. 


अनिल कपूर म्हणाले होते की जॅकी श्रॉफ (Jackie Shroff) हे बाहेरून आलेले कलाकार आहेत तरीही त्यांना सुभाष घाई यांच्या चित्रपटातून मोठा ब्रेक मिळाला होता. या चित्रपटामुळे त्यांना चांगली प्रसिद्धी मिळाली आणि ते ए-लिस्टर अभिनेते झाले. त्यांच्या या वक्तव्यावर जॅकी श्रॉफ यांनी प्रतिक्रिया दिली आहे. 


'कॉफी विथ करण सीझन 7' च्या नव्या एपिसोडमध्ये अनिल कपूरने खुलासा केला की जॅकी श्रॉफच्या यशाबद्दल ते असुरक्षित होते कारण त्यांना सुभाष घई यांच्या बॅनरखाली एक चित्रपट मिळाला होता. अभिनेता जॅकीबद्दल बोलल्यानंतर करणने अनिलला नेपोटिझमबद्दल आपले विचार मांडण्यास सांगितले होते आणि अनिल 'छोट्या भूमिका' करत असताना जॅकी हे 'बाहेरील' असूनही तो ए-लिस्टर झाला होता. 


जेव्हा चाहते जॅकीचा ऑटोग्राफ घ्यायला जायचे तेव्हा जॅकी मला माझी सही घ्यायला बोलवायचा आणि मग तो त्याची सही करायला सांगायचा, हे माझ्यासाठी आश्चर्यकारक असल्याचेही अनिल कपूर यांनी नमूद केले. 


जॅकी श्रॉफ प्रतीक गांधी आणि शर्मीन सहगल यांच्यासोबत 'अतिथी भूतो भव:' मध्ये दिसणार आहे. तर अनिल कपूर हृतिक रोशन आणि दीपिका पदुकोणसोबत 'फायटर' या अॅक्शन चित्रपटात दिसणार आहेत तसेच रणबीर कपूरसोबत संदीप रेड्डी वंगा यांचा 'अ‍ॅनिमल' देखील आहे.