Asha Parekh on Bollywood Dance: बॉलीवूड चित्रपटसृष्टीत सध्या हिंदी गाण्यांचे रिमिक्स बनवणे, तद्दन मसाला देणारी गाणी तयार करणे, गाण्यात अश्लील शब्द वापरणे तसेच पाश्चात्त्य संगीताचे आणि नृत्याचे अंधानुकरण करणे अशा अनेक गोष्टींमुळे सध्या बॉलीवूडमध्ये हंगामा सुरू आहे. मागच्या पिढीला मात्र हा प्रकार अतिशय खटकन असून त्यांच्यादृष्टीनं कलात्मक पुर्णतः हरवली असून फारच मोचके कलाकार आहेत जे आपल्या संस्कृतीचं दर्शन संगीतातून आणि नृत्यातून प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहेत. (vetern actress asha parekh says she is not happy on seeing indian dance culture getting westernized)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हिंदी चित्रपटसृष्टीत साठ ते सत्तरच्या दशकात आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकून घेणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री आशा पारेख यांना नुकताच सन्माननिय दादासाहेब फाळके पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. सध्या आशा पारेख यांना बॉलीवूडमधील हीच गोष्ट खटकते आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार बॉलीवूडमध्ये पारंपारिक नृत्याचे चित्र फारच कमी झाले असून पाश्चात्त्य नृत्याची सरळसोट कॉपी केली जात आहे. 


आशा पारेख स्वतः एक शास्त्रीय नृत्यांगना आहेत. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत आशा पारेख यांनी बॉलीवूडमधील नृत्यशैलीतील बदलाबद्दल सांगितले आहे. आजकाल लोक आपलं मूळ विसरले आहेत, असं त्यांना प्रामाणिकपणे वाटते. त्यांनी जुन्या सुपरहिट हिंदी गाण्यांच्या रिमिक्सवर त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.


अभिनेत्री आशा पारेख यांनी एका मुलाखतीत सांगितले आहे की, ते विसरतायत की आपली नृत्य परंपरा काय आहे ते, आपण आपलीच नृत्याची परंपरा विसरलो आहोत आणि आम्ही पाश्चिमात्य नृत्याचे अनुकरण करण्याचा प्रयत्न करत आहोत. मला वाटतं तुम्ही माझ्याशी सहमत असाल कारण आजकाल आपण ज्या प्रकारचा डान्स पाहतोय ती आपली शैली नाही. केवळ संजय लीला भन्साळींच्या चित्रपटांमध्येच पारंपरिक नृत्य पाहायला मिळते. त्यांच्या चित्रपटांमध्ये भारतीय संस्कृतीला मान मिळतो असं म्हणत त्यांनी संजय लीला भन्साळींचे कौतुक केले. 


आशा पारेख यांनी गाण्यांचे रिमिक्स अतिशय भयानक असे वर्णन केले आहे. मूळ गाण्यांचा गोडवा रिमिक्सच्या ढोल-ताशांच्या कडकडाटात बुडून जातो. शब्द हरवून जातात, असंही त्यांनी सांगितले. 


आशा पारेख म्हणाल्या की, आपल्या देशात नृत्याची इतकी समृद्ध परंपरा आहे की प्रत्येक राज्याची स्वतःची नृत्यशैली आहे आणि आपण काय करतोय? पाश्चिमात्य नृत्याचे अनुकरण करण्याचा प्रयत्न. कधी कधी असं वाटतं की आपण एरोबिक्स करतोय, नाचत नाही आहोत. हे सर्व पाहून मन दुखी होतंय.