Struggle Story: एकेकाळी भांडी घासून पोट भरायचा `हा` विनोदी कलाकार, नंतर असे गाजले सिनेमे
Dhumal Actor: अशाच एका कलाकाराची कहाणी तुम्हाला नक्कीच प्रेरणा देऊन जाईल. मनोरंजन क्षेत्रात असे अनेक दिग्गज अभिनेते आहेत ज्यांचा प्रवास कधीच सोप्पा नव्हता आज आम्ही तुम्हाला अशाच एका कलाकाराबद्दल सांगणार आहोत. ज्यांची 36 सावी पुण्यतिथी आहे.
Dhumal: आपल्याला आपल्या आयुष्यात अशा अनेक प्रसंगांना तोंड द्यावे लागते (Marathi Actors Struggle Story) आणि त्यातून समोर येणाऱ्या प्रत्येक कठीण प्रसंगातून आपल्याला मार्ग काढत आयुष्याच्या शिखरावर पोहचावे लागते. या जगात असा कोणीही व्यक्ती नाही जो यशस्वी होण्यासाठी परिश्रम न करता पुढे आला आहे. सर्वांनाच जीवनात यशस्वी होण्यासाठी अनेक कठीण दिव्यांतून जावे लागते मग ते आपल्या वैयक्तिक आयष्यातील प्रसंग असतोत वा व्यावसायिक जीवनातील परंतु परिश्रम केल्याशिवाय आपल्याला आयुष्यात काही मिळवता येत नाही. अशाच एका कलाकाराची कहाणी तुम्हाला नक्कीच प्रेरणा देऊन जाईल. मनोरंजन क्षेत्रात असे अनेक दिग्गज अभिनेते आहेत ज्यांचा प्रवास कधीच सोप्पा नव्हता आज आम्ही तुम्हाला अशाच एका कलाकाराबद्दल सांगणार आहोत. ज्यांची 36 सावी पुण्यतिथी आहे. (vetern marathi actor anant balwant dhumal who used to wash utensils became the most famous comedy actor in marathi and hindi film industry trending news marathi)
या कलाकारांचे नावं आहे अनंत बळवंत धुमाळ. अनंत धुमाळ (Anant Dhumal) यांचा जन्म 1914 साली झाला होता. त्यांचे वडील बळवंत धुमाळ हे वकील होते. त्यामुळे त्यांचा आधार हे फक्त त्यांचे वडीलचं होते. धुमाळ हे 10 वर्षांचे असतानाच त्यांचे वडील गेले आणि सगळी जबाबदारी त्यांच्यावर आली. शेवटी त्यांनी मिळेल तर काम स्विकारले. नाटक कंपनी ते येण्या-जाणाऱ्या माणसांना ते पाणी द्यायचे. नाटकमंडळीची जेव्हा पंगत उठायची तेव्हा धुमाळ हे त्यांची भांडी घासायचे. पण तरीही ते नाटकात आनंदानं काम करायचे. जर का नाटकात कोणी कलाकार आजारी पडला अथवा आला नाही तर त्याची भुमिकाही ते करायचे.
अशी त्यांच्या अभिनयाची सुरूवात झाली. त्यांनी लग्नाची बेडी आणि घराबाहेर या दोन नाटकांमध्ये काम केली तेव्हा ही नाटकं विशेष गाजली होती. त्यानंतर त्यांनी अनेक मराठी आणि हिंदी चित्रपटांमधून कामं केली आहेत. त्यांची ओळख इतकी वाढली की मेहमूद (Mehmood), शोभा खोटे यांच्यासोबतचे त्यांचे नावं हे लोकप्रिय ठरले. वो कौन थी, गुमनाम, ससुराल, तुमसे अच्छा कौन है, ब्रम्हचारी, मेरा नाम जोकर, चाचा चौधरी, बंबई का बाबू, काश्मिर की कली अशा हिंदी तर पेडगावचे शहाणे, आम्ही जातो आमुच्या गावा अशा मराठी चित्रपटांतून भुमिका केल्या आहेत.
धुमाळ या आडनावानं त्याला चित्रपटसृष्टीत ओळखले जायचे. त्यांचे नाव हे 'धुमल' असेही झाले होते कारण हिंदीत ळ चा उच्चार हा ल होत असे. प्र. के.अत्रे आणि नानासाहेब फाटक यांच्याशी त्यांची खूप चांगली ओळख झाली आणि ते या क्षेत्रात पुढे गेले. 13 फेब्रुवारी 1987 साली त्यांनी या जगाचा निरोप घेतला.