मुंबई : अभिनेत्री कतरिना कैफ आणि अभिनेता विकी कौशल लग्नानंतर त्यांच्या कानात व्यस्त झाले आहेत. विकी कतरिनाला खूश ठेवण्यासाठी सर्व प्रयत्न करतो.  सध्या प्रत्येक जण ख्रिसमस या सणाची मज्जा घेत आहे. असं असताना विकी कतरिनाशिवाय पहिला सण कसा साजरा करेल? म्हणून कतरिनासोबत ख्रिसमस साजरा करण्यासाठी विकी शूटिंगमधून ब्रेक घेऊन घरी परतला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

लग्नानंतर विकी-कतरिनाचा पहिला सण आहे. शुक्रवारी रात्री विकीला विमानतळावर स्पॉट करण्यात आलं. यावेळी कॅमेरामॅनने विकीला कॅमेऱ्यात कैद केलं. विकी विमानतळावर दिसताचं चाहत्यांना त्याला घेरलं आणि आपल्या आवडत्या अभिनेत्यासोबत फोटो काढले. 


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 


सांगायचं झालं तर विकी आणि कतरिनासाठी यंदाचा ख्रिसमस खास आहे. कारण लग्नानंतर दोघे त्यांच्या नव्या घरात शिफ्ट झाले आहेत. काही दिवसांपूर्वी त्यांच्या नव्या घराची पूजा देखील झाली.  लग्नानंतर विकी आणि कतरिनाचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. 


राजेशाही थाटात लग्न पार पडल्यानंतर हे दोघं आता मुंबईत आले आहेत. बऱ्याच फॅन पेजेसवर हे फोटो पोस्ट करण्यात आले आहेत. जे सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत.  सर्वच स्तरांतून विकी आणि कतरिनावर शुभेच्छांचा वर्षावही करण्यात येत आहे.