विकी कौशल आणि कतरिना कैफच्या लग्नात वऱ्हाड्यांना मोठी बंधन
विकी कौशल आणि कतरिना 9 डिसेंबरला राजस्थानमधील सवाई माधोपूर येथील सिक्स सेन्स फोर्ट बरवारा येथे मोठ्या थाटामाटात लग्न करणार आहेत.
मुंबई : राजस्थानमधील सवाई माधोपूर येथील बरवाड़ा येथे होणाऱ्या अभिनेता विकी कौशल आणि अभिनेत्री कतरिना कैफ यांच्या शाही विवाह सोहळ्यासाठी येणाऱ्या स्टार्संना नोटीस पाठवली आहे. ही नोटीस मोबाईल फोनचा वापर करू नये आणि मोबाईल फोनवरून कोणत्याही प्रकारचे फोटोग्राफी सोशल मीडियावर शेअर करू नये यासाठी इव्हेंट कंपनीने ही नोटीस पाठवली आहे.
लग्नाचं ठिकाण असलेल्या बरवडा किल्ल्यावरील प्रत्येक खोलीत, पाहुण्यांच्या वाहनांमध्ये लग्नाच्या इव्हेंट कंपनीने जारी केलेल्या नोटिसीची प्रत लावण्यात आली आहे. पाहुण्यांना दिलेल्या नोटीसमध्ये, इव्हेंट कंपनीला लग्न समारंभाशी संबंधित कोणत्याही समारंभाचे फोटो, व्हिडिओ सार्वजनिक करू नयेत आणि गोपनीयता राखण्याची विनंती करण्यात आली आहे. तसंच इव्हेंट कंपनीने पाहुण्यांना त्यांचे फोन नं वापरण्याचं आणि फोन रुमवर ठेवून येण्याचं आवाहन केलं आहे.
या नोटीसमध्ये सगळ्यात आधी पाहुण्यांचं स्वागत केलं गेलंय यानंतर, या नोटीसमध्ये लिहंलय की, आता तुम्ही जयपूर ते रणथंबोर अशी रोड ट्रिप करणार आहात. यासोबतच मोबाईलवरून फोटो व्हिडिओ सार्वजनिक करू नका, असं आवाहनही नोटीसमध्ये करण्यात आलं आहे. कतरिना कैफ आणि विकी कौशल 9 डिसेंबरला राजस्थानमधील सवाई माधोपूर येथील सिक्स सेन्स फोर्ट बरवारा येथे मोठ्या थाटामाटात आणि शाही पद्धतीने लग्न करणार आहेत.
कतरिना-विकीच्या लग्नाच्या विधींना आजपासून सुरुवात झाली आहे. काल रात्रीच हे कपल राजस्थानला लग्नाच्या ठिकाणी पोहोचले होते. हा विवाह सोहळा पूर्णत: गोपनीय ठेवण्यात आला असून चोख सुरक्षा व्यवस्था करण्यात आली आहे. त्याचबरोबर लग्नाला पाहुणे येण्याची प्रक्रियाही आता सुरू झाली आहे.
चित्रपट दिग्दर्शक कबीर खान आणि अभिनेत्री नेहा धुपियासह अनेक सेलिब्रिटी जयपूर एइरपोर्टवर स्पॉट झाले आहेत. याशिवाय पंजाबी गायक गुरदास मान, विजय कृष्ण आचार्य, अभिनेता सावेरी वाघ दिग्दर्शक नित्या मेहरा, अभिनेत्री मिनी माथूर, अंगद बेदी, मालविका मोहनन यांच्यासह अन्य सेलिब्रिटी जयपूर विमानतळावर स्पॉट झाले.