मुंबई : अभिनेता विकी कौशल आणि अभिनेत्री कतरिना कैफ लवकरच लग्नबंधनात अडकणार आहेत. संगीत, मेहंदी सारखे अनेक सोहळे आता राजस्थानमधील सवाई माधवपूर येथे पार पडत आहे. सगळीकडे यांच्या लग्नाची चर्चा असताना विकी कौशलची एक्स गर्लफ्रेंड हरलीन सेठीची एक भावनिक पोस्ट चर्चेत आली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अभिनेता विकी कौशलची एक्स गर्लफ्रेंड हरलीन सेठीची नोट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हरलीन सेठीने तिच्या इंस्टाग्राम स्टोरीमधील नोट शेअर केली. ज्यामध्ये लिहिले आहे, 'सतत आयुष्याचा अर्थ शोधणे म्हणजे टोस्टचा अर्थ शोधण्यासारखे आहे. कधी कधी फक्त टोस्ट खाणे चांगले असते.'' 



हरलीनने या पोस्टमध्ये कोणाचे ही नाव घेतलेले नाही. पण सोशल मीडियावर दावा केला जात आहे की, ही पोस्ट तिचा एक्स बॉयफ्रेंड विकीची आहे.


हरलीन सेठीचे चाहते आणि सर्व सोशल मीडिया यूझर्स तिच्या पोस्टवर प्रतिक्रिया देत आहेत. कतरिना कैफला डेट करण्यापूर्वी विकी कौशल हरलीन सेठीला डेट करत होता. दोघांनी बराच काळ एकमेकांना डेट केले, त्यानंतर विकी कौशलचा चित्रपट उरी: द सर्जिकल स्ट्राइक रिलीज झाल्यानंतर ते वेगळे झाले.



मिळालेल्या माहितीनुसार, हरलीन सेठीचा असा विश्वास होता की उरी द सर्जिकल स्ट्राइक रिलीज झाल्यानंतर विकी कौशलच्या वागण्यात खूप बदल झाला आहे. यामुळे दोघांमध्ये ब्रेकअप झाले.