मुंबई : बॉलिवूडचा किंग खान म्हणजेच शाहरुख खान (Shahrukh Khan) हा लोकप्रिय अभिनेत्यांपैकी एक आहे. शाहरुखच्या पुनरागमनाची आतुरतेने चाहते प्रतिक्षा करत आहेत. तेच प्रेक्षक आता त्याच्या चित्रपटांवर बहिष्कार टाकण्याची मागणी करत आहेत. अलीकडेच नेटकऱ्यांनी शाहरुखच्या आगामी 'पठाण' चित्रपटावर बहिष्कार टाकण्याची मागणी केली. याआधीही असे अनेक प्रसंग आले, जेव्हा शाहरुखवर कोणत्या ना कोणत्या कारणाने टीका झाली आहे. पण लोक काहीही म्हणतील, शाहरुखचे चाहते आणि जवळच्या लोकांना माहित आहे की हा अभिनेता सर्वांसाठी कसा खास आहे. विकी कौशलचे वडील आणि प्रसिद्ध स्टंट दिग्दर्शक शाम कौशल यांनी देखील शाहरुखसोबत काम केले आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शाम कौशल यांनी ईटाइम्सला नुकतीच मुलाखत दिली. शाहरुखनं शाम आणि त्यांची पत्नी वीणा आणि मुलगा विकी कौशलला ज्या प्रकार वागणूक दिली, आदर दिला, त्यामुळे ते कसे  भावूक झाले याविषयी सांगितले. शाम कौशल गेल्या 21 वर्षांपासून शाहरुखसोबत काम करत आहेत. त्यांनी 'अशोका'पासून 'ओम शांती ओम'पर्यंत अनेक चित्रपटांमध्ये शाहरुखचे स्टंट कोरिओग्राफ केले. शाम यांनी शाहरुखच्या कामाबद्दलच्या समर्पणाची स्तुती केली आणि तो कसा सर्वांचा आदर करतो आणि खूप प्रेम करतो हे सांगितले.


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 


2019 मध्ये झालेल्या फिल्मफेअर अवॉर्ड्समधील एक किस्सा आठवत शाम म्हणाले, 'कोणत्या व्यक्तीचा आदर कसा करायचा हे चित्रपटसृष्टीतील शाहरुख खानकडून शिकू शकता. शाहरुख तुमच्याशी ज्या प्रकारे ट्रीट करतो, त्यामुळे तुम्हाला खूप आनंद होतो. आजही आमचं तेच नातं आहे जे अनेक वर्षांपूर्वी 'अशोका' चित्रपटाच्या वेळी होतं. आम्ही दोघं एकमेकांशी पंजाबीत बोलतो. शाहरुख भाई आणि विकी 2019 फिल्मफेअर अवॉर्ड्स होस्ट करत होते. मी अवॉर्ड फंक्शनला गेलो तर मला जिथे बसायला सांगितले जाते तिथे मी बसतो. मी त्या शोला जाण्याचं कारण माझा मुलगाही तो होस्ट करत होता.


शाम पुढे म्हणाले, 'शाहरुख आणि विकी स्टेजवर आले. स्क्रिप्टमध्ये नसलेल्या सर्व गोष्टी शाहरुखने बोलायला सुरुवात केली. त्याने विकीला विचारले मी कुठे बसलो आहे. मी माझ्या पत्नीसोबत पाचव्या-सहाव्या रांगेत बसलो होतो. सगळे कॅमेरे माझ्या दिशेने वळले. शाहरुखनं विकीला सांगितलं की, जेव्हा मी इंडस्ट्रीत नवीन होतो तेव्हा तुझ्या वडिलांनी मला खूप काही शिकवलं. अशाच अनेक गोष्टी शाहरुखनं सांगितल्या. सगळ्यांचं लक्ष आमच्याकडे होतं. मी भावूक झालो आणि विचार केला की मला आता रडायला येणार. देवाच्या कृपेने मला माझ्या कारकिर्दीत अनेक पुरस्कार मिळाले आहेत, पण फिल्मफेअरचा तो क्षण मी कधीच विसरू शकत नाही. त्यानंतर जेव्हा मी विकीला विचारले की शाहरुखनं जे काही सांगितलं ते स्क्रिप्टचा भाग आहे का? तर विकी म्हणाला नाही, हा स्क्रिप्टचा भाग नव्हता. उलट व्हॅनिटी व्हॅनमधून येताच शाहरुख त्याला विचारत होता की शाम जी आले आहेत का? तुझी आई पण आली आहे का? त्यांचं नाव काय? त्या गोष्टी ऐकून मी आणि वीणा रडलो.


या गोष्टींमुळेच तो शाहरुख खान बनवतं, असं शाम कौशलनं म्हणाले. ते म्हणाले, 'मी माझ्या मुलांना सांगितलं की असे क्षण खूप काही शिकवतात. जेव्हाही मी एखाद्या अवॉर्ड शोमध्ये गेलो आणि तो शो शाहरुख खान होस्ट करत असेल, तेव्हा तो नेहमी माझ्याबद्दल चांगल्या गोष्टी सांगतो . माझ्यासाठी ते कोणत्याही पुरस्कारापेक्षा मोठं आहे.'


शाहरुख लवकरच 'पठाण' आणि 'जवान' या चित्रपटात दिसणार आहे. अलीकडेच, तो आर माधवनच्या 'रॉकेट्री: द नंबी इफेक्ट' आणि 'लाल सिंग चड्ढा'मध्ये कॅमिओ भूमिकेत दिसला होता. शाहरुखचा शेवटचा चित्रपट 2018 मध्ये'झिरो' चित्रपटात दिसला.  तेव्हापासून शाहरुखचे चाहते त्याच्या पुनरागमनाची आतुरतेने वाट पाहत आहेत.