मुंबईः कॅटरिना आणि विक्की कौशल त्यांच्या लवी-डवी फोटोंसह चाहत्यांना ट्रीट करण्यात कोणतीही कसर सोडत नाही. मग ते त्यांच्या लग्नाचे कधीही न पाहिलेले फोटो असोत किंवा हनिमूनचे फोटो. दोघेही अनेकदा सोशल मीडियावर त्यांचे रोमँटिक क्षण चाहत्यांशी शेअर करत असतात. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सध्या हे जोडपे न्यूयॉर्कमध्ये एकमेकांसोबत चांगला वेळ घालवत आहेत. त्यांनी न्यूयॉर्कमधील काही खास फोटो शेअर केले आहेत. कॅटरिनाने तिच्या आवडत्या कॅफे 'bubby'मधील दोन फोटो शेअर केले आहेत.



पती विकीसोबत कॅफेमध्ये बसलेल्या कॅटरिनाचा आनंद चेहऱ्यावर स्पष्ट दिसत आहे. कॅटने त्यांच्या आवडत्‍या डिशचा फोटो शेअर करून चाहत्‍यांचे लक्ष वेधलं आहे...दुसरीकडे, विकी कौशलने पत्नीसोबत रस्ता ओलांडताना एक रँडम क्लिक शेअर केला. 


कॅटरिनाच्या लूकबद्दल बोलायचं तर तिने हिरव्या रंगाचा ओव्हरसाईज शर्ट, निळ्या डेनिमसह फर जॅकेट घातले आहे. तर विकीने पांढरा टी-शर्ट, निळा डेनिम आणि डेनिम जॅकेट आणि कॅपसह कॅज्युअल लुक कॅरी केला आहे. 


विकी कौशल आणि कतरिना कैफ यांचं लग्न गेल्या वर्षी 9 डिसेंबरला राजस्थानमधील सवाई माधवपुर येथील सिक्स सेन्स फोर्ट इथं थाटामाटात पार पडलं. लग्नानंतर दोघेही एकमेकांसोबत वेळ घालवताना दिसत आहेत.