मुंबई : अभिनेत्री कतरिना कैफ आणि विकी कौशल यांच्या लग्नाच्या गेल्या अनेक दिवसांपासून आहे. दोघांकडूनही याबाबत कोणतेही अधिकृत वक्तव्य आलेले नसले तरी त्यांच्या लग्नाला येणाऱ्या पाहुण्यांच्या यादीतून सुरक्षा व्यवस्थेशी संबंधित बातम्या समोर आल्या आहेत. राजस्थानमधील सिक्स सेन्स फोर्टमध्ये 7 ते 9 डिसेंबरला दोघेही लग्न करणार आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आता बातम्या येत आहेत की दोघांनी त्यांच्या लग्नातील फोटोंचे हक्क एका प्रसिद्ध मासिकाला विकले आहेत आणि त्यासाठी त्यांना मोठी रक्कम देण्यात आली आहे.


या जोडप्याच्या जवळच्या एका सूत्राने सांगितले की, कतरिना आणि विकी कौशलच्या लग्नाच्या फोटोंचे हक्क एका आंतरराष्ट्रीय मासिकाच्या भारतीय आवृत्तीला विकले गेले आहेत. यासाठी दाम्पत्याला चांगली रक्कम मिळाली आहे. अभिनेत्री कतरिना आणि तिच्या टीमने मॅगझिनच्या लोकांशी चर्चा केली आणि शेवटी हा करार चांगल्या रकमेत निश्चित झाला.



अशा परिस्थितीत दोघांच्या लग्नाची निवडक फोटो सोशल मीडियावर समोर येतील आणि ते हे जोडपे शेअरही करतील. म्हणजेच दोघांच्या लग्नाचे काही फोटो लोकांसमोर येऊ शकतील.