कतरिनाची आठवण आल्यावर Vicky Kaushal काय करतो? व्हिडिओ व्हायरल
अलीकडेच कतरिना विकीसोबत इंदौरमध्ये काही दिवस घालवून परतली आहे.
मुंबई : बॉलिवूड अभिनेता विकी कौशल सध्या त्याच्या आगामी चित्रपटाच्या शूटिंगसाठी इंदौरमध्ये आहे. तेथे सारा अली खानसोबत तो चित्रपटाचे शूटिंग करत आहे. विकी सध्या सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे.
तो दररोज त्याच्या शूटचे फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असतो. विकी कौशलने गेल्या महिन्यात कतरिना कैफसोबत लग्नगाठ बांधली. विकी लग्नानंतरच कामावर परतला असून तो आता कतरिनाला खूप मिस करत आहे.
लग्नानंतर काही वेळातच विकी चित्रपटाच्या शूटिंगसाठी इंदौरला आला होता. अलीकडेच कतरिना विकीसोबत इंदौरमध्ये काही दिवस घालवून परतली आहे.
आता कतरिनाची आठवण आल्यावर विकी सेंटी गाणी ऐकतोय. विकीने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला आहे.
विकी कौशल त्याच्या मॉर्निंग जॅमचे व्हिडिओ शेअर करत असतो. शूटिंगला जात असताना त्याने कारमधील एक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यामध्ये तो सांसों की माला हे गाणं गाताना दिसत आहे.
व्हिडिओमध्ये विकीचा लूक खूपच मस्त दिसत आहे. त्याने पांढऱ्या रंगाचा टी-शर्ट घातला आहे. तसेच सनग्लासेस आणि कॅप घातली आहे.
विकी कौशलही सध्या त्याच्या फिटनेसची खूप काळजी घेत आहे. त्याने जबरदस्त बॉडी बनवली आहे. नुकताच त्याने जिममधील एक फोटो शेअर केला आहे, ज्यामध्ये त्याची जबरदस्त बॉडी दिसत आहे.