Vicky Kaushal Got Rejected and Humiliated at Auditions : बॉलिवूड अभिनेता विकी कौशलला कोणत्याही ओळखीची गरज नाही. विकी कौशलनं वेगवेगळ्या धाटनीच्या भूमिका साकारत प्रेक्षकांच्या मनात छाप सोडली. विकी हा सीनियर स्टंट डायरेक्टर शाम कौशल यांचा मुलगा असला तरी देखील त्यानं स्वत: चं स्थान निर्माण करण्यासाठी खूप स्ट्रगल केलं. अभिनय क्षेत्रातील त्याचा प्रवास हा सोपा नव्हता. त्यानं देखील अनेक नकार आणि निंदा/ त्याच्यावर खिल्ली उडवलेल्या सगळ्या गोष्टींचा सामना केला. अनेकदा त्याचं ऑडिशन घेण्यास नकार देण्यात आला. नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत त्याविषयीचा खुलासा स्वत: त्याचे वडील शाम कौशल यांनी केला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शाम यांनी सांगितलं की त्यांची इच्छा होती की 'त्यांच्या मुलांनी अभ्यासाकडे लक्ष द्यावं. त्यांच्या दोन्ही मुलांनी जेव्हा अभिनेता होण्याची इच्छा त्यांना सांगितली तेव्हा त्यांना खूप मोठा धक्का बसला. "मी नकार देऊ शकत नव्हतोस कारण मी स्वत: त्याच इंडस्ट्रीमध्ये अनेक वर्षांपासून काम करत होतो. मला वाटलं की माझा आदर करुन कोणी त्यांना चहा प्यायला देतील, पण कोणी त्यांच्या चित्रपटामध्ये कोटींची गुंतवणूक करेल असं मला वाटलं नव्हतं. कारण मी देखील एका गावातून आलो होतो आणि खूप मेहनत करतो. त्यामुळे मला विश्वास होता की जर ते प्रामाणिकपणे प्रयत्न करतील तर त्यांना कोणी नकार देणार नाही", असं शाम म्हणाले. 



हेही वाचा : पायऱ्यांवरून पडल्यानंतर पहिल्यांदाच व्यक्त झाला विजय देवरकोंडा, VIDEO तुफान VIRAL


शाम यांनी पुढे याविषयी सांगितलं की "एक अ‍ॅक्शन दिग्दर्शकाच्या रुपात मी कधी त्यांना काम मिळावं म्हणून कोणाशी संपर्क केला नाही. अनेकदा लोकं हे सांगून नकार द्यायचे की विकीचं ऑडिशन का घ्यायचं."


'डंकी'तील विकीचा फायर आत्महत्या सीन


शाम यांनी यावेळी सांगितलं की " 'डंकी' चित्रपटातील विकीचा स्वत: ला पेटवून घेत आत्महत्या करण्याचा सीन शूट करताना त्याला भीती वाटली. शाम यांनी पुढे सांगितलं की कामाच्या बाबतीत ते खूप निर्दयी आहेत. मी हा विचार करत नाही की हे कसं होणार. आजही जेव्हा मला चित्रपट मिळतात, तेव्हा मी लगेच सीक्वेंसचा विचार करू लागतो, त्यावेळी मी मागे-पुढे विचार करत नाही. पण काही झालं तरी आपलं मन आहे ते विकीला तो स्टंट करताना पाहून मी खूप घाबरलो होतो."