पायऱ्यांवरून पडल्यानंतर पहिल्यांदाच व्यक्त झाला विजय देवरकोंडा, VIDEO तुफान VIRAL

Vijay Deverakonda Shared Falling Down Video :  विजय देवरकोंडानं स्वत: शेअर केला शिड्यांवरून खाली पडतानाचा व्हिडीओ... 

दिक्षा पाटील | Updated: Nov 11, 2024, 06:20 PM IST
पायऱ्यांवरून पडल्यानंतर पहिल्यांदाच व्यक्त झाला विजय देवरकोंडा, VIDEO तुफान VIRAL
(Photo Credit : Social Media)

Vijay Deverakonda Shared Falling Down Video : काही दिवसांपूर्वी दाक्षिणात्य अभिनेता विजय देवरकोंडाचा एक व्हिडीओ व्हायरल झाला. हा व्हिडीओ त्याचा शिड्यांवरून पडतानाचा होता. त्या व्हिडीओला सगळ्यांनी फॉल ऑफ विजय देवरकोंडा असं म्हटलं होतं. विजयचा हा व्हिडीओ 8 नोव्हेंबर रोजी साहिबा या गाण्याचं प्रमोशन करतानाचा आहे. त्यावर आता स्वत: विजय देवरकोंडानं प्रतिक्रिया दिली आहे. पण त्याची ही प्रतिक्रिया काही संतप्त वगैरे नाही तर त्यानं या व्हिडीओचा वापर त्याच्या क्लोथिंग ब्रॅंडला प्रमोट करण्यासाठी केला. 

Add Zee News as a Preferred Source

विजयनं त्याच्या शिड्यांवरून खाली पडण्याच्या व्हिडीओला ट्रांजिशन रिल म्हणून वापरलं. व्हिडीओच्या सुरुवातीला तो आधीचा व्हिडीओ आहे आणि त्यानंतर मात्र तो एका राखाडी रंगाच्या गालिचावर पडल्याचं दिसते. पण तो काय अगदी धडपड नाही तर लॉलिपॉपचा आनंद घेत खाली पडल्याचे पाहायला मिळते. हा व्हिडीओमुळे कॅप्शन आहे की 'पडलो, पडलो, माझ्या RWDY मुला आणि मुलींच्या प्रेमात पडलो. त्यानं पुढे त्यालाच लिहिलं की मी पडलो आणि ते सगळीकडे खूप व्हायरल झालं. हेच तर खरं RWDY आयुष्य आहे. RWDY नेहमीच सुरु राहणार. काहीही झालं तरी RWDY च्या गरजेच्या गोष्टी या नेहमीच विकल्या जातील. खूप प्रेम. RWDY म्हणून राहा.' 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

विजय त्याच्या व्हिडीओला स्पोटिंग पद्धतीनं घेतल्यानं सगळ्यांनी त्याचं कौतुक केलं आहे. एक नेटकरी म्हणाला, हाहाहा, मला हे खूप आवडलं. तू जितकं चांगलं केलं आहे तितकं चांगलं कुणीच करु शकलं नसतं. महत्त्वाचं म्हणजे पडतानाचा व्हिडीओचा फायदा कोणी घेऊ शकतं तर तो तुचं आहेस. दुसरा नेटकरी म्हणाला, अशा प्रकारे आपण या गोष्टी मॅनेज करायच्या असतात. अशा अनेक कमेंट करत नेटकऱ्यांनी त्याची स्तुती केली आहे. 

हेही वाचा : कोणाच्याही वाट्याला इतकं दु:ख येऊ नये; समांथाचा 'तो' VIDEO पाहून नेटकरी झाले भावूक

दरम्यान, विजनच्या कामाविषयी बोलायचं झालं तर तो नुकताच साहिबा नावाच्या एका म्यूजिक व्हिडीओमध्ये राधिका मदान आणि जसलीन रॉयलसोबत अभिनय करताना दिसला. साहिबा या गाण्याचे दिग्दर्शन सुधांशु सरियानं केलं आहे. हे पहिल्यांदा नाही जेव्हा विजय देवरकोंडा आणि राधिका मदान एकत्र दिसले. या आधी त्या दोघांनी चित्रपटांमध्ये देखील एकत्र काम केलं आहे. 

About the Author