Bollywood news : या अभिनेत्रीने तिच्या अभिनयाने आणि दमदार कामगिरीने बॉलीवूडवर राज्य केले आहे. ही अजून कोणी नसून ती आहे कतरिना कैफ. सध्या कतरिना कैफ तिच्या आगामी चित्रपट हॉरर कॉमेडी 'फोन भूत'साठी जोरदार प्रमोशनची तयारी करताना दिसत आहे. या चित्रपटाचा पहिला टीझर रिलीज झाल्यापासून लोक चित्रपटावर प्रेमाचा वर्षाव करत आहेत. या चित्रपटात कतरिना कैफ सोबतच तुम्हाला ईशान खट्टर आणि सिद्धांत चतुर्वेदी या दोन कलाकारांना महत्त्वाच्या भूमिकेत पाहायला मिळणार आहे. अलीकडेच एका मुलाखतीत त्यांच्या चित्रपट आणि वैयक्तिक आयुष्याशी संबंधित अनेक प्रश्नांची उत्तरे त्यांनी दिली आहेत. कतरिना ने तिच्या आणि नवरा विकी कौशल सोबतच्या मैत्रीबद्दलही मनमोकळेपणाने भाष्य केले. (Vicky Kaushals tone changed after Karva Chauth Know What he said to Katrina bollywood news nz)


आणखी वाचा - Deepika Padukone: सर्वात सुंदर महिलांच्या यादीत बॉलीवूडमधील एकमेव अभिनेत्री, ऐश्वर्याचे नाव नसल्याचे आश्चर्य वाटेल!


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

 


 


दोघांचा स्वभाव एकमेकांच्या विरुद्ध कसा आहे हे कतरिना कैफने त्या मुलाखतीत उघडपणे सांगितले.  विकी कौशल खूप शांत आहे, पण कतरिना नेहमीच घाईत असते. तिला तिची कामं झटपट करायला आवडतात. अशात ती घाईघाईत कामं पुर्ण करु लागते. कतरिनाने हे देखील सांगितले की विकी कौशल तिला त्याचे 'पॅनिक बटण' म्हणतो कारण ती कामे लवकर पूर्ण करण्याबद्दल घाबरते.



तिनं त्या मुलाखतीत एक किस्सा देखील सांगितला.. तिचं एकेदिवशी क्रिसमसचे शूट होते तो सीक्वेन्स तिला पुर्ण करण्यात विकीने चांगलीच मदत केली. इतकच नाही तर विकी ने 2 पानांची स्क्रिप्ट अवघ्या काही मिनिटांत पाठंतर केली. 


आणखी वाचा - Justin Bieber ची Ex-Girlfriend दिसली त्याच्या बायकोसोबत... पाहून लोकांच्या भूवया उंचावल्या.


 


 


तुम्हाला माहितच असेल विकी आणि कतरिना या दोघांना बॉलीवूडमध्ये कपल गोल्ससाठी ओळखले जाते. ते दोघं सोशल मीडियावर चांगलेच सक्रिय असतात. ते नेहमीच एकमेकांवरील प्रेम सोशल मीडियावर पोस्ट शेअर करुन व्यक्त करत असतात.