मुंबई : आव्हानात्मक आणि तितक्याच वेगळ्या भूमिका साकारणारी अभिनेत्री कल्की कोचलीन तिच्या खासगी आयुष्यामुळंही तितकीच चर्चेत असते. कल्की सध्या एका मुलीची आईसुद्धा आहे. लिव्ह इन पार्टनरपासून कल्कीला एक मुलगी झाली, जिचं नाव तिनं सॅफो, असं ठेवलं. सध्या हे गोड कुटुंब त्यांच्याच आयुष्यात रममाण आहे. (Kalki Koechlin Bra Strap Video)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कल्की कुटुंबाला प्राधान्य देण्यासोबतच तिच्या कामावरही लक्ष केंद्रीत करताना दिसत आहे. तिची आणखी एक ओळख सांगावी, तर ती कायमच काही न्यूनगंड तोडण्यासाठी तिनं पुढाकार घेतला आहे. 


हीच अभिनेत्री आता एका व्हायरल व्हिडीओमुळे सर्वांची मनं जिंकत आहे. व्हिडीओमध्ये ती ब्रा स्ट्रॅपबद्दल बोलताना दिसत आहे. व्हिडीओमध्ये कल्कीच्या एका जुन्या मुलाखतीतील क्लीप पाहता येत आहे.


जिथं ती ब्रा, अंतर्वस्त्राविषयीचे न्यूनगंड मोडित काढताना दिसत आहे. एकदा मुलाखतीदरम्यानच कल्कीला एका व्यक्तीनं तुझ्या ब्रा चा स्ट्रॅप दिसतोय, असं म्हणत टोकलं. 



त्यावर व्यक्त होत, 'मला क्षमा करा... मी आणखी काय करु शकते' असं ती म्हणाली आणि लगेचच तिनं ब्रा चा स्ट्रॅप फ्लाँट करत टोकणाऱ्या माणसाच्या जणू काही चपराकच लगावली. 


कल्कीचा हा व्हिडीओ जुना असला तरीही तो बरेच समेज गैरसमज मोडित काढण्याचं काम आजही करत आहे.