मुंबई : सेलिब्रिटींचे ड्रेस हे कायमच त्यांना चर्चेत आणण्यामागचं मोठं कारण ठरतात. यातच आता आणखी एका अभिनेत्रीची भर पडली आहे. जिचा ड्रेस तिला भलताच चर्चेत आणून गेला आहे. सोशल मीडियावरील एका व्हिडीओमध्ये तिचा ड्रेस आणि त्यामुळं झालेली मोठी घटना सध्या अनेकांच्याच भुवया उंचावत आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हा व्हिडीओ पाहताना एक क्षण असा येतो, जिथं सर्वांना धक्काच बसायचा बाकी असतो. कारण, ही सेलिब्रिटी बोलत असतानाच तिच्या खांद्यावरून अचानकच ड्रेस निसटतो. 


लोकप्रिय ब्रिटीश गायिका, चार्ली XCX (Charli XCX) हिच्यासोबत हा प्रकार घडला आहे. 


खुद्द चार्लीनंही हा व्हिडीओ शेअर केला आहे. जो प्रचंड व्हायरल होताना दिसत आहे. 


हल्लीच चार्ली ऑस्ट्रेलियन रेकॉर्डिंग इंडस्ट्री म्युझिक अवॉर्ड्स सादर करत होती. व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. 


द किड लेरॉई आणि जस्टीन बिबरला चार्ली अवॉर्ड देत होती. तेव्हाच तिच्या ड्रेसचा स्ट्रॅप खांद्यावरुन घसरला. कमेऱ्यामध्ये ही Oops Moment कैद झाली. ज्यानंतर तिनं लगेचच ड्रेस सावरला आणि हसू लागली. 


चार्लीनं हा व्हिडीओ शेअर करत विजेत्यांचं अभिनंदनही केलं. तिची ही कृती सर्वांना थक्क करणारी होती. 


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

A post shared by Charli (@charli_xcx)



बरं, असं काहीतरी होण्याची चार्लीसोबतची ही पहिलीच वेळ नव्हती. यापूर्वीही ती अशा घटनांना सामोरी गेली होती.