VIDEO: स्टेज शो दरम्यान असं काही झालं की...
नवी दिल्ली : भोजपुरी सिनेमांचे सुपरस्टार खेसारीलाल यादव एका स्टेज शो दरम्यान रडत असल्याचं पहायला मिळालं. बिहारमधील बक्सर येथे एका कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमात भोजपुरी सिताऱ्यांनी उपस्थिती लावली होती. ज्यामध्ये खेसारीलाल, पूनम दुबे, अनारा गुप्ता, ऋतु सिंह आणि कनक पांडे यांचा समावेश आहे. मात्र, शो सुरु असताना खेसारीलाल याला गाणं गातागाता अचानक रडू कोसळलं.
स्टेज शो दरम्यान खेसारीलाल भावूक झाला आणि त्याला अश्रु अनावर झाले. मात्र, खेसारीलाल याने आपलं सादरीकरण थांबवल नाही तर सुरुच ठेवलं. त्याच दरम्यान, अनारा गुप्ता आणि ऋतु सिंह यांनी खेसारीलालचे अश्रु पुसले.
केवीपी इंटरटेन्मेंटने या कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. केवीपी इंटरटेन्मेंटच्या विकास सिंह वीरप्पन यांनी सांगितलं की, खेसारीलाल यादव यांच्या चाहत्यांची संख्या खूपच मोठी आहे. इमोशनल गाणं गात असताना तो भावूक झाला आणि त्याच्या डोळ्यातुन अश्रु आले. खेसारीलाल मनापासून गातात आणि त्यामुळेच त्याच्या चाहत्यांची संख्या मोठी आहे.