Kirron Kher and Badshah : लोकप्रिय रॅपर बादशाह आणि किरण खेर गेल्या अनेक दिवसांपासून 'इंडियाज गॉट टॅलेंट 10' मध्ये परिक्षक म्हणून आहेत. या कार्यक्रमातील काही चंक्स सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्याचा एक प्रोमो देखील सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या प्रोमोमध्ये किरण असं काही बोलताना दिसत आहेत. ज्यानं नंतर बादशाह घाबरल्याचे दिसत आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

इंडियाज गॉट टॅलेंटमधील हा एक छोटा प्रोमो समोर आला आहे. यात मुलींच्या एका ग्रुपनं परफॉर्म केलं. त्यानंतर परिक्षकांना त्यावर कमेंट्स करायच्या होत्या. जेव्हा बादशाहचा नंबर आला तेव्हा तो म्हणाला, 'तुम्हाला या गोष्टीचं वाईट वाटेल पण मी तुमचे यापेक्षा चांगले परफॉर्मेंस पाहिले आहेत.' पण यावर किरण खेर संतापतात. त्या प्रत्येकवेळी हिच कमेंट करताना दिसतो. त्यानंतर बादशाह बोलतो 'का कशाला आणि बोलतो असं आहे, तर अजून काय म्हणाल.' तर लगेच किरण चिडताना दिसतात. त्यानंतर त्या बोलतात की 'प्रत्येकाचा चांगला पर्फॉर्मेंस त्यानं आधी पाहिला आहे. तर बादशाह बोलतो की तो असं यासाठी बोलतो की पुढच्यावेळी ते आणखी चांगल करतील. कारण प्रत्येकवेळी चांगलं असणं महत्त्वाचं आहे.' त्यात लगेच या शोचा सुत्रसंचालक अर्जुन बिजलानी म्हणतात की 'पाजी हेच सगळ्यात चांगलं होतं. तर एक श्वास घेत बादशाह बोलतो की म्हटल ना हाच उत्तम पर्फॉर्मन्स होता पण यापेक्षा चांगला पर्फॉरमन्स मी पाहिला आहे.' 


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 


त्यानंतर पुढे किरण खेर बादशाहला मारू लागतात... तर बादशाह बोलतो की, 'मी नाही खेळणार. हे सगळे आयशा जुल्का आणि दीपक तिजोरी पाहत असल्याचे दिसते. अर्जुन बिजलानी देखील म्हणतात की बादशाह पाजी मला वाटतं की तुम्ही तुमची कमेंट इथेच संपवायला हवी होती. तर रॅपर म्हणाला, माझी कमेंट नाही, मला वाटतं की माझं करिअर संपणार आहे. हे ऐकल्यानंतर किरण खेर जोर-जोरात हसू लागतात.' 


सध्या त्याचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. या व्हिडीओवर अनेक नेटकऱ्यांनी विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत. एक नेटकरी कमेंट करत म्हणाला 'मी शिल्पाला मिस करतो.' दुसरा नेटकरी म्हणाला की 'यांना अशी मस्ती करताना पाहून मज्जा येते.'