मुंबई : अभिनेता अजय देवगण 'टोटल धमाल' या सिनेमातून प्रेक्षकांना हसवण्यासाठी दाखल होतोय. या सिनेमातलं पहिलं गाणं प्रदर्शित करण्यात आलंय. तसं पाहिलं तर या सिनेमात अजय देवगणसोबत अनेक दिग्गज काम करताना दिसणार आहेत. त्यातील दोन मोठे चेहरे म्हणजे अनिल कपूर आणि माधुरी दीक्षित... याशिवाय रितेश देशमुख, जावेद जाफरी, अर्शद वारसी, ईशा गुप्ता आणि संजय मिश्रा हे कलाकारदेखील या सिनेमात हसवण्याचा आपापला वाटा उचलतं आहेत. पण, नुकत्याच प्रदर्शित झालेल्या गाण्यात मात्र अनिल - माधुरीसमोर इतर सगळे कलाकार फिके पडलेत असं म्हटलं तर वावगं ठरायला नको... 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

८० च्या दशकात आलेल्या 'कर्ज' या सिनेमातील किशोर कुमार यांच्या 'पैसा ये पैसा' हे गाणं या सिनेमात नव्यानं सादर करण्यात आलंय. 



या अगोदर या सिनेमाचं पोस्टर आणि ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला होता. या सिनेमाच्या निमित्तानं अनिल कपूर - माधुरी दीक्षित ही जोडी तब्बल १९ वर्षानंतर एकत्र दिसणार आहे. हा सिनेमा २२ फेब्रुवारी रोजी प्रदर्शित होणार आहे.