मुंबई : झी मराठीच्या 'चला हवा येऊ द्या' या लोकप्रिय कार्यक्रमाच्या स्वातंत्र्य दिन विशेष भागात 'मला काहीच प्रॉब्लेम नाही' या चित्रपटाची टीम सहभागी झाली. याचसोबत भारतीय क्रिकेट महिला संघाच्या खेळाडूंनीही या कार्यक्रमाला उपस्थिती लावली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या कार्यक्रमात बोलता - बोलता कुशल बद्रिकेनं गश्मीरची सगळी प्रॉपर्टी आपल्या नावावर लिहून घेतली... पण, 'मला काहीच प्रॉब्लेम नाही' या सिनेमाच्या प्रमोशनसाठी आलेल्या गश्मीरला तसंही म्हणता येईना... त्यामुळे यावेळी त्यानं हसून वेळ मारून नेली... 


यावेळी महिला संघातील मराठमोळ्या असलेल्या स्मृती मंधाना, मोना मेश्राम, पूनम राऊत, पंजाबची हरमनप्रीत कौर आणि या संघाचे प्रशिक्षक तुषार आरवठे हेदेखील उपस्थित होते. येत्या १४ आणि १५ ऑगस्टला रात्री ९.३० वाजता भाग प्रसारित होणार आहेत.