Amir Khan and Kartik Aryan Viral Video: मिस्टर परफेक्शनिस्ट आमीर खान (Amir Khan) आणि कार्तिक आर्यन (Kartik Aryan) यांचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल झाला आहे. या व्हिडीओत दोन्ही अभिनेते 'तूने मारी एंट्री' (Tune Mari Entri) गाण्यावर डान्स करताना दिसत आहे. आमीर खान आणि आर्यन खान पहिल्यांदाच एकत्र दिसल्याने चाहत्यांकडून व्हिडीओला प्रचंड प्रतिसाद मिळत असून व्हायरल झाला आहे. आमीर खान आणि आर्यन खान भोपाळमधील एका लग्नात सहभागी झाले होते. यावेळी त्यांनी पाहुण्यांसह डान्स करत मनोरंजन केलं. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आमीर खानने सध्या अभिनयातून ब्रेक घेतला आहे. सध्या तो कुटुंबाला आणि स्वत:ला वेळ देत आहे. दुसरीकडे कार्तिक आर्यन आपल्या आगामी 'शेहजादा' (Shehzada) चित्रपटामुळे चर्चेत आहे. दोघेही एका लग्नाच्या निमित्ताने एकत्र आले असता आपल्या डान्सने सर्वांचं लक्ष वेधलं. 


तुम्ही आमीर आणि कार्तिक आर्यन डान्स करतानाचा हा व्हिडीओ पाहिलात का?



हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. आमीर आणि आर्यनने रणवीर सिंग आणि अर्जुन कपूरच्या गाण्यावर डान्स केला आहे. 'गुंडे' चित्रपटातील या गाण्यात रणवीर आणि अर्जून मुख्य भूमिकेत होते. 


दरम्यान आमीर खानने फक्त डान्सच नाही तर गाणं गातही उपस्थितांचं मनोरंजन केलं. आमीरने 'राजा हिंदुस्तानी' चित्रपटातील 'आये हो मेरी जिंदगी मै' गाणं गायलं असून तो व्हिडीओही व्हायरल झाला आहे. 



लग्नामध्ये आमीर खानसह त्याची पूर्वाश्रमीची पत्नी किरण रावही उपस्थित होती. काही फोटोंमध्ये दोघेही लग्नाचा आनंद घेताना, गप्पा मारताना दिसत आहेत. 


कार्तिक आर्यन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला


कार्तिक आर्यनचा 'शेहजादा' चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे. रोहित धवनने दिग्दर्शित केलेल्या या चित्रपटात कार्तिकसह क्रिती मेनन, मनिषा कोईराला आणि परेश रावल मुख्य भूमिकेत आहेत. हा चित्रपट अल्लू अर्जूनच्या Ala Vaikunthapurramuloo चा रिमेक आहे. याशिवाय कार्तिक Aashiqui 3 आणि Satyaprem Ki Katha या चित्रपटांमध्येही दिसणार आहे.