मुंबई : दिल्लीतील शीतल पेरी या तरूणीचा व्हिडिओ सध्या इंटरनेटवर खूप व्हायरल होत आहे. या व्हिडियोमध्ये शीतल खूपच जबरदस्त नृत्य करताना दिसते आहे. तिच्या या नृत्याने लोकांची मन जिंकली आहे.
 


नृत्य करायला मला खूप आवडते


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


मीडियाच्या अहवालानुसार शीतल पेरी ही एक नृत्यांगना आहे. ती दिल्लीत राहणारी एक तरूणी आहे. नृत्य हे तिच्यासाठी जीव की प्राण आहे. शीतल एक नृत्य आयोजक सुद्धा आहे. नृत्या बद्दल लोकांना ती कौशल्य आणि प्रेरणा देते. तिच्या या नृत्याने सोशल मीडियावर लोकं तिचं खूप कौतुक करत आहेत.
 


१० लाखांपेक्षा अधिक जणांनी पाहिला व्हिडिओ



शीतलचा हा व्हिडीयो यू-ट्यूब चॅनलवर Tensen Dwarka या नावाने अपलोड केला आहे. तिचा या व्हिडियोला लोकांनी १,०७८०५३ वेळा बघितला आहे. या व्हिडिओला तरुणांची सर्वाधिक पसंती मिळाली आहे.