IIFA 2024 पुरस्कार सोहळ्यातील विजेत्यांच्या घोषणेनंतर आता या सोहळ्यातील शाहरुख खान आणि राणी मुखर्जीचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आंतरराष्ट्रीय भारतीय चित्रपट अकादमी पुरस्कार सध्या अबू धाबी येथे आयोजित करण्यात आला होता. हा पुरस्कार सोहळा तीन दिवस सुरू होता. या फिल्म फेस्टिव्हलमध्ये बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान होस्ट होता. 


27 सप्टेंबरपासून IIFA सोहळा सुरु झाला आहे. पहिल्याच दिवशी या सोहळ्यात तमिळ, तेलुगू, मल्याळम आणि कन्नड चित्रपटसृष्टीतील कलाकारांना स्टेजवर गौरविण्यात आले. त्यांना आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकली. IIFA सोहळ्याच्या दुसऱ्या दिवशी देखील अनेक बॉलिवूड कलाकारांनी हजेरी लावली होती. 


IIFA सोहळ्यामधील शाहरुख खानचा व्हिडीओ व्हायरल 


IIFA 2024 चा दुसरा दिवस बॉलिवूड अभिनेता शाहरुखा खान, करण जोहर आणि विक्की कौशल यांनी होस्ट केला होता. अभिनेता शाहरुख खानच्या या सोहळ्यामधील होस्टिंग लोकांना खूप आवडले. मात्र, IIFA सोहळ्याच्या स्टेजवर असे काही घडले की, शाहरुख खानचा स्टेजवरील व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. 


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

शाहरुख खानने IIFA सोहळ्याच्या स्टेजवर फक्त डान्सच केला नाही तर आपल्या मनसोक्त स्टाइलने IIFA सोहळ्यासाठी आलेल्या सर्व प्रेक्षकांचे मनोरंजन केले. 


राणी मुखर्जी यांच्या साडीचा पल्लू पकडला


IIFA पुरस्कार सोहळ्यामध्ये अनेक खास क्षण बघायला मिळाले. ज्यामध्ये काही गोष्टींनी प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतलं. परंतु राणी मुखर्जी आणि शाहरुख खान यांच्यातील नाते बाकीच्यांपेक्षा खूप वेगळे होते. दोघे एकत्र बसले होते. ते स्टेजवर देखील एकमेकांना भेटले. त्यावेळी शाहरुख खानने असे काही केले ज्यामुळे लोकांना 'कुछ कुछ होता है' चित्रपटाची आठवण आली. 


नेमकं काय घडलं? 


जेव्हा राणी मुखर्जी मिसेस चॅटर्जी उर्फ नॉर्वेसाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार घेण्यासाठी IIFA सोहळ्याच्या मंचावर आल्या तेव्हा तिने करण जोहरला मिठी मारली. त्यानंतर त्या स्टेजवरून जाताना अभिनेता शाहरुख खानने राणी मुखर्जी यांच्या साडीचा पल्लू त्याच्या पायात अडकू नये म्हणून तो हातात पकडला. शाहरुख खानचे हावभाव पाहून राणी मुखर्जीने त्याचे आभार मानले. सध्या या दोघांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. या दोघांना पुन्हा एकत्र पाहून चाहत्यांना त्याच्या पहिल्या चित्रपटाची आठवण झाली. सध्या दोघांना एकत्र चित्रपटामध्ये पाहण्यासाठी देखील चाहते खूप उत्सुक आहेत.