मुंबई : प्रजासत्ताक दिनाला प्रदर्शित होणाऱ्या अभिनेता अक्षय कुमार आणि मराठमोळी अभिनेत्री राधिका आपटे यांच्या 'पॅडमॅन' या सिनेमातलं पहिलं गाणं प्रदर्शित झालंय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

प्रसिद्ध गायक अरिजित सिंह याच्या आवाजातलं 'आज से तेरी' हे गाणं प्रेक्षकांना चांगलंच भावलंय. या गाण्यात साध्या साध्या गोष्टींतला रोमान्स अक्षय कुमार शिकवताना दिसतोय.


या गाण्यात राधिका आणि अक्षय लग्नाच्या जोड्यात सात फेरे घेताना दिसत आहेत. लाल रंगाच्या साडीत राधिका अत्यंत साध्या रुपातही खूपच देखणी दिसतेय. 


अक्षय कुमारनं आपल्या ट्विटर अकाऊंटवर हे गाणं शेअर केलाय.