मुंबई : मंगळवारी रात्री बॉलिवूडसाठी एक खास रात्र होती... निमित्त होतं बॉलिवूडची 'मसक्कली' सोनम कपूर हिच्या लग्नाचं आणि रिसेप्शनचं... या निमित्तानं बॉलिवूडचे अनेक चेहरे एकत्र जमले होते. रणवीर सिंह, वरुण धवन, शाहरुख खान, सलमान खान यांसारखे अनेक ताऱ्यांनी सोनम-आनंदच्या लग्नाला हजेरी लावली... त्यामुळे या सोहळ्याची रौनक काही वेगळीच होती.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सोनमच्या रिसेप्शनचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर वायरल होताना दिसत आहेत आणि यामध्ये शाहरुखपासून रणवीरपर्यंत अनेक कलाकार मस्ती करताना आणि डान्स करताना दिसला. 

एका व्हिडिओत रणवीर सिंह आपल्या खिलचजी अवतारात दिसला. रणवीर मस्तमौला अंदाजात सोनमच्या रिसेप्शनमध्ये जमिनीवर बैठक मारून डान्स करताना दिसला. इतकंच नाही तर त्यानं डान्स करताना सोनमचा चुलत भाऊ अर्जुन कपूर यालाही आपल्यासोबत जमिनीवर खेचलं... आणि दोघं एकत्र डान्स करताना दिसले. पाहा हा व्हिडिओ...


मंगळवारी मुंबईच्या 'द लीला' हॉटेलमध्ये सोनम कपूर आणि आनंद आहुजा यांच्या लग्नाचं ग्रॅन्ड रिसेप्शन पार पडलं. सोनम आणि आनंदचं 'अनंद कारज'चा विधी (पंजाबी विवाह) मंगळवारी सकाळी पार पडला. सायंकाळी या जोडप्याचं रिसेप्शन आयोजित करण्यात आलं होतं. सोनम आपल्या लग्नात लाल भडक रंगाच्या ड्रेसमध्ये दिसली... तर रिसेप्शनसाठी तिनं सफेद आणि करड्या रंगाचा लेहंगा आणि क्रॉप टॉप स्टाईलचा ड्रेस परिधान केला होता. सोनम आणि आनंदनं आपलं रिसेप्शनही चांगलंच एन्जॉय केलं.